Viral video couple wearing garland of shoes social media jhansi up myb | बापरे! प्रेमविवाह करणं चागलंच अंगाशी आलं; नातेवाईकांनी भर रस्त्यात 'असं' काही केलं....

बापरे! प्रेमविवाह करणं चागलंच अंगाशी आलं; नातेवाईकांनी भर रस्त्यात 'असं' काही केलं....

प्रेमविवाह केल्यानंतर काय काय होतं हे तुम्हाला माहित असेलच पण इथे जे झालं ते फारंच भयंकर आहे. प्रेमविवाह केल्याची चांगलीच किंमत या जोडप्याला मोजावी लागली आहे. मुलाने प्रेमविवाह करून मुलगी पळवून आणल्यानंतर रागाच्या भरात असलेल्या मुलाकडच्या लोकांनी  या दोघांना चक्क चपलांचा हार घातला आहे. इतकंच नाही तर या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा प्रकार उत्तरप्रदेशातील  झांशीमध्ये घडला आहे. 

कपल को जूतों की माला पहनाकर सोशल मीडिया पर वायरल किया वीडियो

झांशीमधील समथर भागातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या दोघांना प्रेमविवाह केल्याप्रकरणी चपलांचा हार घालून अपमानित करण्यात आलं आहे. या दोघांच एकमेकांवर खूप प्रेम होतं. घरच्यांची परवानगी नसल्याने त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचं ठरवलं. त्यानंतर मुलाच्या घरच्यांनी आपल्या नातेवाईकांना बोलवून या दोघांना चपलांचा हार घातला आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. 

कपल को जूतों की माला पहनाकर सोशल मीडिया पर वायरल किया वीडियो

पीडीत जोडप्याने सांगितलं की, आम्ही रस्त्यावरून जात असताना काही नातेवाईकांनी आम्हाला पकडलं आणि चपलांचा हार गळ्यात घालून आम्हाला बेअब्रु करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणाबाबत स्थानिक पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

जबरदस्त ! नवरा बायकोने असा काय केला डान्स,बॉलिवूड कलाकारांनाही देतायेत टक्कर

कसं आहे व्हाईट हाऊसमधील सीक्रेट बंकर, ज्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना लपवलं जातं....

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Viral video couple wearing garland of shoes social media jhansi up myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.