मांजरीला घाबरून काठीच्या टोकावर जाऊन बसला उंदीर, मजेदार व्हिडीओ पाहून लोटपोट झाले लोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 11:00 IST2022-03-21T10:58:07+5:302022-03-21T11:00:04+5:30
Viral Video : व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, मांजरीला उंदराची शिकार करायची आहे, पण उंदीर अजिबात खाली येण्यास तयार नाही.

मांजरीला घाबरून काठीच्या टोकावर जाऊन बसला उंदीर, मजेदार व्हिडीओ पाहून लोटपोट झाले लोक
Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी ते हैराण करणारे तर कधी थक्क करणारे असतात. पण सध्या एक मजेदार मांजरीचा आणि उंदराचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, मांजरीला उंदराची शिकार करायची आहे, पण उंदीर अजिबात खाली येण्यास तयार नाही.
अर्थातच मांजरीला उंदीर घाबरलेला आहे. तो आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी जाऊन बसला. तर मांजर वाट बघत आहे की, कधी उंदीर खाली येतो आणि कधी मी त्याची शिकार करते. पण पुढे होतं हे काही व्हिडीओत दाखवण्यात आलेलं नाही. मात्र, व्हिडीओ फार मजेदार आहे. हा व्हिडीओ पाहून टॉम अॅन्ड जेरीचं कार्टून नक्की आठवतं.
इन्स्टाग्रामवर हा मजेदार व्हिडीओ 0zr_t नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ८० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख १६ हजार लोकांनी व्हिडीओला लाइक केलं आहे. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.
एका यूजरने व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं की, हे रिअल लाइफ टॉम आणि जेरी आहेत. तर एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, खाली उतर नाही तर खूप मार खाशील. एकाने लिहिलं, कधीही हार मानू नका. लोक अशा मजेदार कमेंट्स करत आहेत.