मासा फ्राय करायला आला, पण स्वतः फ्राय होता-होता राहिला, व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 20:19 IST2025-06-24T20:17:12+5:302025-06-24T20:19:03+5:30

Viral Video: हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Viral Video: came to fry Fish, but was fried himself, watch shockng video | मासा फ्राय करायला आला, पण स्वतः फ्राय होता-होता राहिला, व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

मासा फ्राय करायला आला, पण स्वतः फ्राय होता-होता राहिला, व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

Viral Video: सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. आताही एक व्हिडिओ आगीसारखा व्हायरल होत आहे. पण, यावेळी आग खरोखरची लागली आहे. एक माणूस नदीकाठी मासा शिजवत होता. त्याने तव्यावर तेल गरम केले, मोठ्या उत्साहाने भाज्या कापल्या, मसाले टाकले अन् मोठा मासा गरम तेलात टाकला. पुढे जे झाले, ते पाहून तुम्हाला धक्का तर बसेलच, पण हसुही आवरणार नाही.

मासा तळताना तो थोडक्यात बचावला
व्हिडिओमध्ये दिसते की, एक तरुण नदीकाठी मासा शिजवत आहे. यासाठी तो तव्यावर तेल गरम करतो अन् त्यात मसाले लावलेला भलामोठा मासा शिजवण्याचा प्रयत्न करतो. तो मासा तेलात टाकताच आगीचा भडका उडतो. दुसऱ्याच क्षणी तो स्वतःला वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसतो. 

हा व्हिडिओ @PalsSkit नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी व्हिडिओला लाईकदेखील केले आहे. सोशल मीडिया युजर्स व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले... भाऊ, तू थोडक्यात वाचलास. तर दुसऱ्याने लिहिले...भाऊ, मृत्यू पाहिल्यानंतर तुला कसे वाटले. अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकरी करत आहेत. 

Web Title: Viral Video: came to fry Fish, but was fried himself, watch shockng video