VIDEO : अचानक लग्नात पोहोचला नवरीचा प्रियकर, मग झालं असं काही बघून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 16:06 IST2022-03-09T16:04:08+5:302022-03-09T16:06:02+5:30
Viral Video : व्हायरल झालेला हा व्हिडीओ नवरी-नवरदेव आणि नवरीचा प्रियकर यावर आहे. स्टेजवर हार घालण्याची तयारी सुरू आहे. अशात असं काही घडतं की, बघून सगळेच हैराण झाले.

VIDEO : अचानक लग्नात पोहोचला नवरीचा प्रियकर, मग झालं असं काही बघून व्हाल अवाक्
Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे कित्येक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. नवरी-नवरदेवांचे हे व्हिडीओ आवडीने बघितले जातात. कधी नवरी-नवरदेवाच्या डान्सचे व्हिडीओ तर कधी वरातीतील लोकांचे फनी व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण कधी कधी तर लग्नातील असे काही व्हिडीओ व्हायरल होतात जे बघून हैराण व्हायला होता. असाच एक मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ नवरी-नवरदेव आणि नवरीचा प्रियकर यावर आहे. स्टेजवर हार घालण्याची तयारी सुरू आहे. अशात असं काही घडतं की, बघून सगळेच हैराण झाले. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नवरीच्या प्रियकरावर दया येईल. अनेक लोक हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत. तर अनेकांना हसू येत आहे.
नवरी-नवरदेव स्टेजवर असताना अचानक लग्नात नवरीचा प्रियकर येतो आणि डायलॉगबाजी सुरू करतो. नवरीला प्रेमाची आठवण करून देतो. पण त्यानंतर नवरी त्याला जे बोलते ते ऐकून तोच काय व्हिडीओ बघणारेही अवाक् होतात. खरंतर ही काही खरी घटना नाही. हा व्हिडीओ मनोरंजनासाठी बनवण्यात आलेला दिसतोय. म्हणजे हा एक प्रॅंक व्हिडीओ आहे. पण लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडला. लोक भरभरून हा व्हिडीओ शेअर करत आहेत आणि आनंद घेत आहेत.