गायीसमोर करू लागला ‘मार डाला’ गाण्यावर डान्स, गाईने खरच मारले; पहा Video...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 14:51 IST2022-08-19T14:50:19+5:302022-08-19T14:51:17+5:30
हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

गायीसमोर करू लागला ‘मार डाला’ गाण्यावर डान्स, गाईने खरच मारले; पहा Video...
Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा मजेदार व्हिडिओ व्हायरल होतात. काहींना पाहून तुम्ही चकीत होता, तर काहींना पाहून तुम्ही पोट धरुन हसू लागता. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला हसू तर येईलच, पण धक्काही बसेल. एका व्यक्तीच्या डान्स व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेत्री माधुरी दीक्षितवर चित्रित झालेल्या 'मार डाला...' या सुपरहिट गाण्यावर हा माणूस नायतोय. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की चड्डी घातलेला एक माणूस गायीसमोर उभा राहतो, आधी बॉडी बिल्डिंग पोज देतो आणि मग नाचू लागतो. बॉलीवूडचे सुपरहिट गाणे 'मार डाला' बॅकग्राऊंडमध्ये वाजत असते. गायीसमोर नाचताना तो चित्र-विचित्र स्टेप्स करतो. गायीला त्याचा नाच आवडत नाही आणि ती अचानक त्याला जोरदार टक्कर मारते. यानंतर जे काही होते, ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.