Video: बर्थडे गर्लने केकवरच्या मेणबत्तीवर मारली फुंकर अन् उडाला आगाची भडका, पुढे काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:44 IST2025-02-25T16:43:15+5:302025-02-25T16:44:01+5:30
Birthday Baloon catches fire viral video: वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरु होणार म्हणून त्या मुलीने पोज दिली अन् मग सगळं घडलं

Video: बर्थडे गर्लने केकवरच्या मेणबत्तीवर मारली फुंकर अन् उडाला आगाची भडका, पुढे काय झालं?
Birthday Baloon catches fire viral video: सोशल मिडीयावर कधी काय व्हायरल होईल कुणीच सांगू शकत नाही. सोशल मीडिया हे एक असे व्यासपीठ आहे जिथे दररोज लाखोंच्या संख्येने व्हिडीओ, फोटो अपलोड होतात आणि त्यातील निवडक गोष्टी व्हायरल होतात. व्हायरल होणारी प्रत्येक गोष्ट मजेशीरच असते असे नाही. काही वेळा एखादा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा असतो तर एखादा व्हिडीओ खाडकन डोळे उघडणारा असतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बर्थडे केकवर मेणबत्तींना फुंकर मारताच मोठी आग लागते असे दिसते.
वाढदिवस साजरा करतानाच भयंकर प्रसंग
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, एका मुलीचा वाढदिवस असतो. तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरु होणार असते. ती मुलगी हातात बर्थडे केक घेऊन पोज देते आणि व्हिडीओ काढायाला सुरुवात होते. पण जेव्हा ती केकच्या वरील मेणबत्तीला फुंकर मारते, नेमका त्याच वेळी तिच्या चेहऱ्यासमोर एक फुगा येतो, आणि अचानक मोठा स्फोट होतो. त्या मुलीच्या चेहऱ्याच्या आजुबाजूला जाळ निर्माण होतो. तिच्या चेहऱ्यालाही आगीची झळ बसते. आणि ती हातातला केक टाकून बाजूला सरकते. पाहा तो व्हायरल व्हिडीओ-
कुठला आहे हा व्हिडीओ? त्या मुलीला किती दुखापत झाली?
दरम्यान, व्हिएतनाममधील हनोई येथील हा व्हिडीओ आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान फुग्यांमध्ये मोठा स्फोट होतो आणि मुलगी त्यात भाजते असा तो प्रकार घडतो. मिळालेल्या माहितीनुसार, हा भयानक प्रकार घडल्याने वाढदिवस असलेल्या मुलीचा चेहरा गंभीरपणे भाजला आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, तिच्या जखमा बऱ्या होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. जर तुम्हीही एखाद्या बर्थडे पार्टीत किंवा फंक्शन फुग्यांची सजावट करत असाल तर हा व्हिडीओ नक्कीच बोध घेण्यासारखा आहे. कारण फुग्यांमुळे सजावट चांगली होत असली तरीही तुम्हाला सावधही राहावेच लागेल हेच यातून शिकता येईल.