Viral: महिलेची पर्स घेऊन उडाला पक्षी, मग जे झालं ते बघून म्हणाल - 'काय नशीब आहे?'.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 17:06 IST2021-11-08T17:05:34+5:302021-11-08T17:06:16+5:30

Social Viral : जरा विचार करा की, तुम्ही कुठेतरी आरामात बसले आहात आणि अचानक एक पक्षी येऊन तुमची एखादी वस्तू उचलून नेली तर? अर्थातच तुम्ही चिंतेत रहाल.

Viral Video : Bird took away purse funny viral video | Viral: महिलेची पर्स घेऊन उडाला पक्षी, मग जे झालं ते बघून म्हणाल - 'काय नशीब आहे?'.

Viral: महिलेची पर्स घेऊन उडाला पक्षी, मग जे झालं ते बघून म्हणाल - 'काय नशीब आहे?'.

Social Viral : सोशल मीडियावर प्राण्यांचे एकापेक्षा एक मजेदार व्हिडीओ शेअर होत असतात. काही व्हिडीओ तर असे असतात ज्यांवर विश्वास ठेवणं अवघड होऊन बसतं. तेच काही व्हिडीओ असे असतात की, ते बघूनच जोरात हसू येत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ज्यात एक पक्षी महिलेची पर्स घेऊन उडतो. यानंतर जे होतं ते बघून तुम्ही पोट धरून हसाल. 

जरा विचार करा की, तुम्ही कुठेतरी आरामात बसले आहात आणि अचानक एक पक्षी येऊन तुमची एखादी वस्तू उचलून नेली तर? अर्थातच तुम्ही चिंतेत रहाल. तुमची वस्तू मिळवण्यासाठी तुम्ही हात पाय माराल. एका महिलेसोबत असंच काहीसं झालं. ती एका पार्कमध्ये बसली होती. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, महिलेच्या बाजूला पर्स, मोबाइल फोन आणि डब्बा ठेवला आहे. अचानक एक पक्षी तिथे येतो आणि पर्स घेऊन उडतो. महिला त्या पक्ष्यामागे धावत जाते. पण तोपर्यंत पक्षी पर्स घेऊन गायब झालेला असतो.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे महिला पक्ष्यामागे धावते. पण तरीही तिला पर्स परत मिळत नाही. महिला टेंशनमध्ये येते. ही संपूर्ण घटना कॅमेरा कैद झाली आहे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. इंन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ 'hepgul5' नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तर तेवढेच लाइक्सही मिळत आहेत.
 

Web Title: Viral Video : Bird took away purse funny viral video