Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 14:55 IST2025-09-21T14:54:37+5:302025-09-21T14:55:18+5:30
China Metro Video : गेल्या काही दशकांमध्ये चीनने केवळ आर्थिकच नाही, तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले आहे.

Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
चीन हा देश तंत्रज्ञान आणि नवनवीन गोष्टींमध्ये जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे. गेल्या काही दशकांमध्ये चीनने केवळ आर्थिकच नाही, तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले आहे. सध्या सोशल मीडियावर चीनच्या अशाच एका आश्चर्यकारक तंत्रज्ञानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक थक्क झाले आहेत. एका भारतीय तरुणाने चीनमध्ये फिरताना हा अद्भुत नजारा आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
बिल्डिंगमधून धावणारी मेट्रो!
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, भारतीय तरुण उत्साहाने सांगतो की, तो त्याच्या फॉलोअर्सना अशी एक गोष्ट दाखवणार आहे, जी त्यांनी याआधी कधीही पाहिली नसेल. त्यानंतर तो आपला कॅमेरा फिरवतो आणि एका भव्य इमारतीतून बाहेर येणाऱ्या मेट्रोचे दृश्य दाखवतो. आजवर आपण सर्वांनी भुयारातून किंवा बोगद्यातून धावणाऱ्या मेट्रो पाहिल्या आहेत, पण थेट रहिवासी इमारतीच्या आतून जाणारी ही मेट्रो खरोखरच अविश्वसनीय आणि चीनच्या प्रगत तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना आहे.
१.५ कोटी लोकांनी पाहिला व्हिडीओ
हा व्हिडीओ 'himatsangwan' नावाच्या इन्स्टाग्राम आयडीवरून शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत १.५ कोटी पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओला ८ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत आणि त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, “हे दृश्य तर एखाद्या दुसऱ्या ग्रहावरील वाटते.” दुसऱ्या एका युजरने कमेंट करत लिहिले की, “म्हणूनच म्हणतात, चीनची बरोबरी कोणीच करू शकत नाही.” आणखी एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, “जर हे खरं असेल, तर मी आता चीनला माझ्या फिरण्याच्या यादीत नक्कीच या ठिकाणाला सामील करेन.”