VIRAL VIDEO : वय केवळ आकडाच! ८२ वर्षांच्या आजीने केली भारतातील सगळ्यात उंच बंजी जम्पिंग; पाहून अंगावर येतील शहारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 12:03 IST2025-10-24T12:02:53+5:302025-10-24T12:03:28+5:30
Bungee Jumping Viral Video : 'वय फक्त एक आकडा असतो' ही म्हण ऋषिकेशमधून आलेल्या एका व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा खरी ठरली आहे.

VIRAL VIDEO : वय केवळ आकडाच! ८२ वर्षांच्या आजीने केली भारतातील सगळ्यात उंच बंजी जम्पिंग; पाहून अंगावर येतील शहारे
Bungee Jumping Viral Video : 'वय फक्त एक आकडा असतो' ही म्हण ऋषिकेशमधून आलेल्या एका व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा खरी ठरली आहे. ८२ वर्षांच्या एका उत्साही महिलेने भारतातील सर्वात उंच बंजी जम्पिंगचा थरार पूर्ण करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यांचा हा धाडसी व्हिडीओ इंटरनेटवर हजारो लोकांनी पाहिला असून, त्यांच्या हिंमतीची खूप प्रशंसा होत आहे.
शिवपुरी, ऋषिकेशमध्ये केला स्टंट
ऋषिकेशमधील शिवपुरी येथे असलेल्या भारतातील सर्वात उंच बंजी जम्पिंगच्या ठिकाणचा हा व्हिडीओ आहे. 'globesomeindia' या इंस्टाग्राम हँडलने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “८२ वर्षांच्या महिलेची बंजी जम्पिंग. भारतातील सर्वात उंच बंजी जम्पिंग, शिवपुरी, ऋषिकेशमध्ये.” हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या आजींच्या उत्साहाला आणि धाडसाला सलाम केला आहे.
न डगमगता पूर्ण केली बंजी जम्पिंग!
व्हिडीओच्या सुरुवातीला ही महिला पूर्ण उत्साहात आणि आनंदाने डान्स करताना दिसत आहे. त्यानंतर त्या पूर्ण आत्मविश्वासाने उडी घेण्यासाठी तयार होतात. कोणतीही भीती न बाळगता, त्या उंच प्लॅटफॉर्मवरून खाली उडी घेतात. ही थरारक उडी त्यांनी ज्या धाडसाने पूर्ण केली, ते पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आणि तोंडात बोट घातले.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
या आजींचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला असून, त्यावर हजारो लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. युजर्सनी या महिलेच्या जगण्याच्या उत्साहाचे आणि हिंमतीचे कौतुक केले आहे. एका युजरने कमेंट केली, "मी नेहमी ज्येष्ठांना सांगतो की, हा रोमांच अनुभवण्याचा सर्वोत्तम काळ आहे, कारण आता गमवायला काहीच शिल्लक नाहीये!" दुसऱ्या एका युजरने, "या व्हिडीओने मला आनंद दिला! त्या खऱ्या अर्थाने आयुष्य जगत आहेत!". काही युजर्सनी गंमतीने लिहिले की, "आमच्या आजींना वाटले की हा व्हिडिओ AIने तयार केला आहे."
या व्हिडिओने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची इच्छाशक्ती आणि उत्साह असल्यास, वयाचा कोणताही अडथळा येत नाही.