Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:00 IST2025-08-21T16:00:09+5:302025-08-21T16:00:51+5:30
आफ्रिकेच्या जंगलातील एका व्यक्तीला पहिल्यांदाच रसगुल्ला खायला दिला, आणि त्यांचा तो अनुभव पाहून जगभरातील नेटकरी थक्क झाले आहेत.

Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
भारताच्या एका लोकप्रिय ट्रॅव्हल व्लॉगरने आफ्रिकेतील एका जमातीला पहिल्यांदाच रसगुल्ला खायला दिला, आणि त्यांचा तो अनुभव पाहून जगभरातील नेटकरी थक्क झाले आहेत. व्लॉगरने याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून, तो इतका खास आणि मन जिंकणारा आहे की, खासकरून भारतीय त्याला खूप पसंत करत आहेत.
हा व्हिडीओ ट्रॅव्हल व्लॉगर विनोद कुमार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. विनोद कुमार त्यांच्या ‘रोमिंग विथ विनू’ या युट्यूब चॅनलसाठी ओळखले जातात. त्यांनी नुकताच टांझानियामधील प्रसिद्ध शिकारी जमात ‘हदजाबे’ (Hadzabe Tribe) सोबत बराच वेळ घालवला आणि त्यांना भारतीय चहा, पार्ले जी बिस्किट आणि आपल्या लाडक्या मिठाई रसगुल्लाची चव देखील चाखायला दिली.
रसगुल्ला खाल्ल्यावर भन्नाट रिॲक्शन
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, व्लॉगर एका ‘हदजाबे’ व्यक्तीला मातीच्या कुल्हडमध्ये रसगुल्ला आणि त्याचा पाक भरून देतो. तो व्यक्ती जेव्हा रसगुल्ल्याचा गोड पाक पितो, तेव्हा तो आनंदाने अक्षरशः नाचायला लागतो. त्याची रिॲक्शन इतकी जबरदस्त असते की, तो आनंदाच्या भरात उड्या मारू लागतो. हे पाहून तुम्हालाही आपला आनंद आवरता येणार नाही.
या व्हिडीओला ३० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, तर १ लाख ८५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. कमेंट सेक्शनमध्येही लोकांनी खूप प्रेम आणि खास प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने कमेंट केली आहे, "रसगुल्ल्याचा पाक पिताच तो लहान मुलासारखा आनंदाने उड्या मारू लागला." दुसऱ्या एका युजरने लिहिले, "लहानपणी मी जेव्हा मिल्क पावडर चोरून खायचो, तेव्हा असाच आनंद व्हायचा." एका युजरने तर गंमतीशीर भाषेत लिहिले, "एकदा हाजमोला ट्राय करा, मग बघा रिअॅक्शन."