आजच्या जीवनशैलीत हेअर स्ट्रेटनर, कर्लर आणि ड्रायर यांसारखे हेअर स्टायलिंग टूल्स महिलांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. खास समारंभांसाठी किंवा रोजच्या स्टायलिंगसाठी यांचा वापर सर्रास होतो. मात्र, या उपकरणांचा निष्काळजीपणे केलेला वापर किती धोकादायक ठरू शकतो, याचा धक्कादायक अनुभव देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये एका महिलेच्या केसात हेअर कर्लर इतका वाईट पद्धतीने अडकला की, तो बाहेर काढण्यासाठी चक्क हातोडीचा वापर करावा लागला. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, सौंदर्य उपकरणांचा वापर करताना योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
वेदनेने विव्हळणाऱ्या महिलेची धडपड
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते की, एका महिलेच्या डोक्याच्या मागच्या बाजूला हेअर कर्लर पूर्णपणे अडकून बसला आहे. वेदनेने ती महिला विव्हळत आहे, तर बाजूला असलेले दोन लोक तिची मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सुरुवातीला तो कर्लर ओढून किंवा हलवून काढण्याचा प्रयत्न केला गेला, पण तो निष्फळ ठरला. शेवटी, दुसरा कोणताही पर्याय न राहिल्याने, केसांचे नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन हातोडीच्या सहाय्याने कर्लरचा काही भाग तोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
बचावकार्य ठरले कसोटीचे!
या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अतिशय सावधगिरीने हातोडीने कर्लरवर वार करत असल्याचे दिसते, जेणेकरून महिलेच्या डोक्याला इजा होणार नाही. त्याचवेळी दुसरी महिला हळूवारपणे महिलेचे केस सोडवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून केस ओढले जाणार नाहीत. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत वेदनादायक होती. महिला ओरडत असताना आजूबाजूचे लोक तिला शांत राहण्याचा आणि धीर धरण्याचा सल्ला देत होते. बराच वेळ लागला, पण अखेरीस कर्लरचे तुकडे झाले आणि महिलेचे केस सुखरूप बाहेर आले. हा थरार संपल्यावर तिथे उपस्थित लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला, पण महिलेच्या चेहऱ्यावर भीती आणि वेदना स्पष्टपणे दिसत होत्या.
Web Summary : A viral video shows a woman's hair severely tangled in a hair curler, requiring a hammer to dismantle the device. The painful ordeal highlights the potential dangers of careless use of styling tools, urging caution when using such devices.
Web Summary : वायरल वीडियो में एक महिला का बाल हेयर कर्लर में बुरी तरह फंस गया, जिसे निकालने के लिए हथौड़े का इस्तेमाल करना पड़ा। यह घटना हेयर स्टाइलिंग टूल्स के लापरवाही से उपयोग के खतरों को दर्शाती है, और सावधानी बरतने का आग्रह करती है।