खेळता-खेळता वॉशिंग मशीनमध्ये घुसला चिमुकला, दुसऱ्यानं सुरू केलं बटन! अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 12:08 IST2023-06-03T12:08:10+5:302023-06-03T12:08:46+5:30

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ पालकांच्या निष्काळजीपणाचेच उदाहरण आहे.

viral video A child entered the washing machine while playing, the other started the button | खेळता-खेळता वॉशिंग मशीनमध्ये घुसला चिमुकला, दुसऱ्यानं सुरू केलं बटन! अन्...

खेळता-खेळता वॉशिंग मशीनमध्ये घुसला चिमुकला, दुसऱ्यानं सुरू केलं बटन! अन्...

सोशल मिडियावर अशा अनेक गोष्टी व्हायरल होत असतात ज्या पाहिल्यानंतर लोक चकित होतात. असा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. खरे तर लहान मुलांसंदर्भात एखादी गोष्ट बघितली, की आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. पालकांनीही मुलांसाठी अत्यंत सावधगिरी बाळगायला हवी त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवे अन्यथा ते खेळत असताना मोठा अपघातही होऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ पालकांच्या निष्काळजीपणाचेच उदाहरण आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन मुले सोबत खेळताना दिसत आहेत. हे दोघेही जबरदस्त मस्ती करताना दिसत आहेत. ते एका वॉशिंग मशिनजवळ खेळत आहेत. यांपैकी एक जण आनंदाच्या भरात वॉशिंग मशीनमध्ये घुसतो. तर दुसरा वॉशिंग मशीन सुरू करतो. ही घटना नेमकी कुठली हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, हा व्हिडीओ पाहून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

अशा प्रकारच्या, छोट्याशा निष्काळजीपणामुळे मोठा अपघात होऊ शकतो. हा व्हिडिओ आपल्याला बघायला चांगला वाटत असला तरी, अशा प्रकारांमुळे मुलाच्या जीवालाही धोका पोहोचू शकतो. याशिवाय, जे लोक सोशल मिडियावर हा व्हिडिओ पाहत आहेत, त्यांतील अनेक लोक, आई-वडिलांनी आपल्या मुलांच्या बाबतीत नेहमीच सतर्क रहायला हवे अन्यथा अपघातही होऊ शकतो, असा सल्ला देत आहे.
 

Web Title: viral video A child entered the washing machine while playing, the other started the button