Viral Video: ७० वर्षांचा नवरदेव अन् २२ वर्षांची नवरी; अनोख्या लग्नाची इंटरनेटवर तुफान चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 14:36 IST2026-02-26T14:34:47+5:302026-02-26T14:36:38+5:30

Pakistan viral wedding Video: प्रेमाला वयाचे बंधन नसते ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल, पण पाकिस्तानातील रावळपिंडीत घडलेल्या एका लग्नाने हे शब्दशः सिद्ध करून दाखवले आहे.

Viral Video: 70-year-old groom and 22-year-old bride; Unique wedding creates a storm of discussion on the internet! | Viral Video: ७० वर्षांचा नवरदेव अन् २२ वर्षांची नवरी; अनोख्या लग्नाची इंटरनेटवर तुफान चर्चा!

Viral Video: ७० वर्षांचा नवरदेव अन् २२ वर्षांची नवरी; अनोख्या लग्नाची इंटरनेटवर तुफान चर्चा!

प्रेमाला वयाचे बंधन नसते ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल, पण पाकिस्तानातील रावळपिंडीत घडलेल्या एका लग्नाने हे शब्दशः सिद्ध करून दाखवले आहे. एका ७० वर्षीय वृद्धाने चक्क २२ वर्षीय तरुणीशी लग्नगाठ बांधली असून, या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ४८ वर्षांचे अंतर असलेल्या या जोडीची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ प्रसिद्धीसाठी बनवले जातात, त्यामुळे या लग्नाच्या सत्यतेबाबत अस्पष्टता आहे.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नवरदेवाचे नाव हकीम बाबर असून त्यांचे वय ७० वर्षे आहे. आपल्या लग्नाबद्दल बोलताना बाबर यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणतात की, "वय हा केवळ एक आकडा आहे. जर तुमचे हृदय तरुण असेल, तर कोणतेही नाते मजबूत राहू शकते." विशेष म्हणजे, हकीम बाबर यांनी एका घटस्फोटित महिलेशी लग्न केले असून, हे पाऊल पूर्णपणे योग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे जोडपे लग्नाच्या पोशाखात अतिशय आनंदात दिसत आहे. दोघेही कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोझ देत फोटो शूट करत आहेत. एका व्हिडिओ क्लिपमध्ये तर २२ वर्षांची नववधू 'एक था टायगर' चित्रपटातील गाणे गुणगुणताना दिसत आहे. तिनेदेखील माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, " खऱ्या प्रेमाला वय नसते, ते कोणत्याही वयात आणि कुणासोबतही होऊ शकते."

नेटीझन्समध्ये संभ्रम आणि चर्चा

हा व्हिडिओ वेगाने शेअर केला जात असला तरी, नेटीझन्समध्ये या लग्नाबाबत संभ्रम पाहायला मिळत आहे. हे लग्न खरोखर झाले आहे की, केवळ मनोरंजनासाठी किंवा प्रँक म्हणून हा व्हिडिओ शूट केला आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, हकीम बाबर आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या मुलाखतींनंतर हे लग्न अधिकृत असल्याची चर्चा रंगली आहे.

Web Title : वायरल: 70 वर्षीय दूल्हे ने 22 वर्षीय दुल्हन से शादी की, इंटरनेट पर हलचल

Web Summary : पाकिस्तान में 70 वर्षीय व्यक्ति ने 22 वर्षीय महिला से शादी की, जिससे इंटरनेट पर सनसनी फैल गई। दूल्हे, हकीम बाबर का कहना है कि उम्र सिर्फ एक संख्या है। जोड़े की खुशी की शादी की तस्वीरें और वीडियो व्यापक रूप से साझा किए गए हैं, हालांकि कुछ लोग उनकी प्रामाणिकता पर सवाल उठाते हैं। उनका दावा है कि यह सच्चा प्यार है।

Web Title : Viral: 70-year-old groom weds 22-year-old bride, sparking internet buzz.

Web Summary : A 70-year-old Pakistani man married a 22-year-old woman, creating an internet sensation. The groom, Hakim बाबर, insists age is just a number. The couple's joyful wedding photos and videos are widely shared, though some question their authenticity. They claim it is true love.