Video : घराचे दार उघडताच दिसला वाघ, महिलेची बोबडी वळाली; पुढे काय घडले? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 14:00 IST2025-02-02T13:59:41+5:302025-02-02T14:00:35+5:30
Viral Tiger Video : हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

Video : घराचे दार उघडताच दिसला वाघ, महिलेची बोबडी वळाली; पुढे काय घडले? पाहा...
Viral Tiger Video : कल्पना करा की, तुम्ही तुमच्या घराचे किंवा इतर कुणाच्या घराचे दार उघडले अन् अचानक तुमच्यासमोर एक वाघ उभा आहे. अशावेळी तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? नक्कीच तुमचे पाय लटलटतील, तुम्हाला घाम फुटेल. आता आपले काही खरे नाही, आपला जीव वाचणार नाही, असे विचार तुमच्या मनात येतील. सध्या एक्सवर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
तुमच्यापेकी अनेकांनी झू किंवा जंगल सफारीदरम्यान वाघ पाहिला असेल. पण, त्यावेळी तुम्ही सुरक्षेच्या घेऱ्यात असता, त्यामुळे वाघाला घाबरण्याची काहीही गरज नसते. पण, तुम्ही कुठल्याही सुरक्षेत नसताना एक खराखुरा वाघ तुमच्या आला तर..? नुसती कल्पना करुन तुम्ही घाबरुन जाल. अशीच परिस्थिती एका महिलेवर ओढवली. नेचर इज अमेझिंग या एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?
व्हिडिओमध्ये महिला चावी लावून दार उघडताना दिसते. तिने दरवाजा उघडताच समोर एक भला मोठा वाघ तिची उभा दिसतो. दोघेही काही सेकंद एकमेकांकडे बघत राहतात. आपल्या घरात चक्क वाघाला पाहून त्या महिलेचा श्वास थांबतो. तो वाघ हल्ला करणार, तेवढ्यात ती दरवाजा लावून घेते.
व्हिडिओ पहा:-
Imagine you open your door and you see this... What would you do?😳 pic.twitter.com/Ymw14Ux4SR
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) January 30, 2025
'असे तुमच्यासोबत घडल्यावर... तुम्ही काय कराल?'
सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 29 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा वाघ घरात कसा पोहोचला? अशा कमेंट्स येत आहेत. काहींच्या मते हा बनावट व्हिडिओ आहे. तर काहींच्या मते हा वाघ पाळीव आहे. काही लोक महिलेच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. हा पाळीव वाघ होता की, जंगलातून आलेला होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण मूळ प्रश्न हाच आहे की, हा वाघ घरात कसा पोहोचला? सोशल मीडियावर लोक याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरी मांडत आहेत.