VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:55 IST2026-04-07T12:54:39+5:302026-04-07T12:55:51+5:30
Viral Video Reaction : आपल्या घरात फ्रीज पाहून त्याच्या आई-वडिलांची जी प्रतिक्रिया होती, तिने सगळ्यांचेच मन जिंकून घेतले आहे.

VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक
Viral Video : शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना फ्रीजचं तसं फारसं कौतुक वाटणार नाही. पण, खेडेगावांमध्ये राहणाऱ्यांसाठी आजही फ्रीज हा कौतुकाचा विषय आहे. सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा आपल्या कष्टाच्या कमाईतून घरात पहिलावहिला फ्रीज घेऊन आला आहे. आपल्या घरात आलेली ही नवी वस्तू बघून आईचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तिच्या चेहऱ्यावरचं कौतुक आणि आनंद पाहून नेटकरी देखील भारावून गेले आहेत.
बिहारचा युट्यूब व्हिडिओ ब्लॉगर सुजीत याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओने नेटकऱ्यांना भावुक केले आहे. एका खेडेगावात राहणाऱ्या सुजीतने मेहनत करून आपल्या स्वतःच्या कमाईतून घरात हा पहिला फ्रीज आणला. आपल्या घरात फ्रीज पाहून त्याच्या आई-वडिलांची जी प्रतिक्रिया होती, तिने सगळ्यांचेच मन जिंकून घेतले आहे.
आईच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहिला आनंद!
मोठमोठ्या शहरांमध्ये घरात महागडे किचन अप्लायंस असतात. त्यांच्यासाठी फ्रीज ही काही विशेष गोष्ट नाही. मात्र, एका खेडेगावातील घरात फ्रीसारखी महागडी वस्तू आणणे ही त्यांच्या कुटुंबासाठी फार मोठी गोष्टी होती. घरात एका नवीन वस्तूचे आगमन त्यांनी असे साजरे केले, जणू काही एखादा सण आहे. यावेळी सुजीतच्या आई-बाबांची प्रतिक्रिया अगदी पाहण्यासारखी होती.
नेटकऱ्यांनी केले कौतुक
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सुजीत आपल्या आईच्या हातून या फ्रीजला अनबॉक्स करताना दिसत आहे. फ्रीज पाहून त्याच्या आईला जो आनंद झाला आणि आपल्या लेकाचा अभिमान वाटला, ते पाहून सगळेच भावुक होत आहेत. आता सुजीतच्या या यशाचे सगळेच तोंडभरून कौतुक करत आहेत. त्याच्या या व्हिडिओला आतापर्यंत तब्बल १५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर, १.५४ लाख लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला असून, त्यावर कौतुकाच्या हजारो कमेंट्स आहेत. 'जिथे आई-वडील खूश राहतात, त्याच घरात देवांचा वायस असतो", 'आई-वडिलांना किती अभिमान वाटत आहे", "भावा खूप छान", "आई-बाबांकडे असंच लक्ष द्या" अशा कमेंट्स या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत.