Viral Story: मोठे घर असूनही रस्त्यावर मागतोय भीक; दर महिन्याला करतो लाखोंची कमाई...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 18:51 IST2022-12-01T18:50:49+5:302022-12-01T18:51:25+5:30
Viral Story: एका भिकऱ्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होतीये, जो महिन्याला लाखोंची कमाई करतो.

Viral Story: मोठे घर असूनही रस्त्यावर मागतोय भीक; दर महिन्याला करतो लाखोंची कमाई...
Trending Story: एका व्यक्तीकडे 5 कोटींपेक्षा जास्तीची संपत्ती आहे, तरीदेखील तो रस्त्यावर भीक मागत फिरतो. यावर तुमचा विश्वास बसेल का? पण, 21व्या शतकात काहीही शक्य आहे. लंडनमधील एक बेघर व्यक्ती दर महिन्याला कमीत कमी 1,300 पौंड(1.27 लाख रुपये) कमाई करतो. डॉम नावाच्या या व्यक्तीने आपल्या संपत्तीबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.
कमी वयात ड्रग्सची सवय
डॉमने सांगितले की, कमी वयात त्याला ड्रग्स घेण्याची सवय लागली होती. काही वर्षानंतर त्याने स्वतःवर नियंत्रण मिळवले, पण नंतर तो पुन्हा ड्रग्सच्या आहारी गेला. विशेष म्हणजे, त्याच्या घरच्या किरायातून होणारी सर्व कमाई तो ड्रग्समध्ये घालतो. तसेच, तो दररोज लंडनच्या रस्त्यांवर भीक मागतो, ज्यातून त्याला दररोज 200 ते 300 पाउंड मिळतात.