VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 13:54 IST2025-09-20T13:53:47+5:302025-09-20T13:54:13+5:30
या स्टंटमध्ये पुरुष बाईक किंवा कार चालवतात, पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक मुलगी बाईक चालवताना दिसत आहे.

VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
'मौत का कुआं' हा खेळ तुम्ही पाहिला असेल. यात धोकादायक स्टंट करत बाईक किंवा कार चालवल्या जातात. एके काळी देशात जिथे कुठे मोठी जत्रा किंवा मेळा भरत असे, तिथे 'मौत का कुआं' नक्कीच असायचा, ज्यामुळे लोकांना दूरवरून आकर्षित केले जायचे. साधारणपणे या स्टंटमध्ये पुरुष बाईक किंवा कार चालवतात, पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक मुलगी बाईक चालवताना दिसत आहे. तिने केलेला स्टंट पाहून प्रेक्षकांचे श्वास थांबले आहेत.
नेमकी काय आहे घटना?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, 'मौत का कुआं'मध्ये मोठी गर्दी जमली आहे. सर्वांच्या नजरा एका मुलीवर खिळल्या आहेत. ही मुलगी बाईक घेऊन रिंगणात येते. बाईक सुरू करण्यापूर्वी प्रार्थना करत आणि काही क्षणातच 'मौत का कुआं'च्या भिंतींवर बाईक वेगाने पळवायला सुरुवात करते. ती बाईक ज्या आत्मविश्वासाने आणि संतुलनाने चालवत आहे, ते पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. तिच्या या हिमतीने तिने सर्वांची मने जिंकली आहेत.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर 'rider_shaktiman_no_1' या आयडीने शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत तो कोट्यवधी लोकांनी पाहिला असून, १८ लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. या व्हिडीओला अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. एका युझरने लिहिले आहे की, "आजपर्यंत 'मौत का कुआं'मध्ये फक्त मुलांनाच पाहिले, पण या मुलीने सिद्ध केले की मुली कोणापेक्षा कमी नाहीत." तर दुसऱ्याने म्हटले आहे की, "हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला, पण तिच्या या हिमतीला सलाम."