Optical Illusion : फोटोत लपला आहे कुत्रा, तीक्ष्ण नजर असेल तर ११ सेकंदात शोधून दाखवा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 13:47 IST2022-12-01T13:46:05+5:302022-12-01T13:47:12+5:30
अगदी तुमच्या डोळ्यासमोर हा कुत्रा बसला आहे. केवळ ११ सेकंदात तुम्हाला कुत्रा कुठे हे शोधायचे आहे.

Optical Illusion : फोटोत लपला आहे कुत्रा, तीक्ष्ण नजर असेल तर ११ सेकंदात शोधून दाखवा !
Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन हा प्रकार तुफान (Viral photo) व्हायरल होतोय कामाच्या ताणातुन थोडा वेळ काढत अशी कोडी सोडवायला अनेकांना मजा येते.अनेक प्रयत्नांनंतरही लोकांना ते सोडवता येत नाही. तर आणखी एक नवे ऑप्टिकल इल्युजन आले आहे जे तुम्हाला गोंधळात टाकणारे आहे.
खाली दिलेला फोटो हा एका पार्क चा आहे. रस्त्याच्या बाजुला एक (bench) बेंच दिसत आहे. तर आजुबाजुला मोठमोठी झाडं आहेत. गवत आहे. पण या पार्क मध्ये एक कुत्रा ही आहे. अगदी तुमच्या डोळ्यासमोर हा कुत्रा बसला आहे. केवळ ११ सेकंदात तुम्हाला कुत्रा कुठे हे शोधायचे आहे.
आपल्यापैकी ९० टक्के लोकांना कुत्रा कुठे बसलाय हे शोधता आले नसेल. अनेकदा असे होते ती गोष्ट समोरच असते पण पटकन डोळ्यांना दिसत नाही. तुमच्यापैकी अनेकांचे चुकीचेही उत्तर आले असणार कारण जिथे नाही तिथे सुद्धा तुम्हाला ती गोष्ट दिसेल अशी मनाची धारणा झालेली असते. तर हा कुत्रा कुठे बसलाय हे बघायचे असेल तर बेंचच्या उजव्या बाजुला बघा जिथे आपण हात ठेऊन बसते.नीट लक्ष देऊन बघितलंत तर त्या दांड्यावर कुत्र्याचा चेहरा बाहेर आलेला दिसेल. अजुनही कळले नसेल तर खाली दिलेल्या फोटोत कुत्र्याची जागा ठळक केली आहे.