काय सांगता! सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या खात्यावर ८७ कोटी जमा झाले; बँकेत पोहोचल्यावर मिळालं 'हे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 10:10 IST2024-12-18T10:09:29+5:302024-12-18T10:10:15+5:30

उत्तर बिहार ग्रामीण बँकेच्या खातेधारकाच्या खात्यावर अचानक ८७ कोटी ६५ लाख ४३ हजार रुपये जमा झाले आहेत. हे खाते सातवीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचे आहे.

viral news What can you say! 87 crores deposited in the account of a student studying in class 7 When he reached the bank, he got 'this' answer | काय सांगता! सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या खात्यावर ८७ कोटी जमा झाले; बँकेत पोहोचल्यावर मिळालं 'हे' उत्तर

काय सांगता! सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या खात्यावर ८७ कोटी जमा झाले; बँकेत पोहोचल्यावर मिळालं 'हे' उत्तर

बिहारमध्ये सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या बँक खात्यात अचानक ८७ कोटी ६५ लाख ४३ हजार रुपये जमा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती विद्यार्थ्याने कुटुंबियांना दिली. याची माहिती लगेच गावभर पोहोचली. पण काही वेळाने ही रक्कम बँकेने कापून घेतली. 

चंदनपट्टी चौकात असलेल्या सायबर कॅफेचे संचालक अविनाश कुमार यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक १२ वर्षांचा विद्यार्थी शाळेने पाठवलेली रक्कम तपासण्यासाठी आला होता. उत्तर बिहार ग्रामीण बँकेच्या सक्रा शाखेत त्यांच्या नावाने खाते उघडले आहे. त्याच्या खात्यातील रक्कम तपासली असता त्यात ८७ कोटींहून अधिक रक्कम पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्यानंतर ही माहिती त्या विद्यार्थ्याला देण्यात आली. 

जम्मूमध्ये माजी डीएसपींच्या घराला आग लागली; सहा जणांचा मृत्यू, चार जखमी

शेखर कुमार यांनी सांगितले की, खात्यात करोडो रुपये जमा झाल्यानंतर खाते गोठवण्यात आले. याबाबतची माहिती देण्यासाठी इस्लामचा मुलगा बँकेत पोहोचताच खात्यात पैसे नव्हते. मात्र, याबाबत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी कोणाकडेही तक्रार केलेली नाही. पैसे कोणी आणि कुठून पाठवले हे कळू शकलेले नाही. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा झाली.

एका विद्यार्थ्याच्या खात्यात एवढी मोठी रक्कम आल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली असून, साक्रा शाखेच्या व्यवस्थापकाने मोबाईल बंद केला. या विद्यार्थ्याने आणि त्याच्या वडिलांनी त्यांचे मोबाईलही बंद केले आहेत. 

चंदनपट्टी पंचायतीचे माजी प्रमुख सोहन प्रसाद यांनी सांगितले की, विद्यार्थी सीएसपीकडून पैसे काढण्यासाठी आला होता. जेव्हा सीएसपी ऑपरेटरने बॅलन्स तपासला तेव्हा त्याच्या खात्यात सुमारे ८७ कोटी रुपये दिसत होते. आम्हाला कळले, पण त्याचे खाते लॉक झाले. त्यामुळे त्या खात्यातून व्यवहार होऊ शकले नाहीत. विद्यार्थ्याचे कुटुंबीय चांगलेच घाबरले आहेत. पैसे कोठून आणि कोणाकडून आले याची माहिती मिळू शकलेली नाही.

या प्रकरणी बँकेच्या चेअरमन यांची प्रतिक्रिया आली आहे. चेअरमन मोहम्मद सोहेल म्हणाले की, या प्रकरणाची मला माहिती नाही. एका विद्यार्थ्याच्या खात्यावर एवढी मोठी रक्कम आली आहे. चौकशीनंतरच याची माहिती देता येईल.

Web Title: viral news What can you say! 87 crores deposited in the account of a student studying in class 7 When he reached the bank, he got 'this' answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.