भारीच! शोरुमच्या बाहेर गरिब मुलं टीव्ही पाहत बसले होते,सेल्समनने केले हृदय पिळवटून टाकणारे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 15:56 IST2023-01-09T15:55:03+5:302023-01-09T15:56:09+5:30

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.अनेक व्हिडिओ हास्यस्पद असतात. तर काही फोटो व्हिडिओ हे भावनिक असतात.

viral news tv store employee wins heart after he played kids favorite cartoon viral | भारीच! शोरुमच्या बाहेर गरिब मुलं टीव्ही पाहत बसले होते,सेल्समनने केले हृदय पिळवटून टाकणारे कृत्य

भारीच! शोरुमच्या बाहेर गरिब मुलं टीव्ही पाहत बसले होते,सेल्समनने केले हृदय पिळवटून टाकणारे कृत्य

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.अनेक व्हिडिओ हास्यस्पद असतात. तर काही फोटो व्हिडिओ हे भावनिक असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका टीव्ही शोरुममधील आहे. या शोरुमधील सेल्समनचे त्याच्या कृतीमुळे नेटकरी कौतुक करत आहेत. 

ट्विटरवर हा व्हिडिओ का वापरकर्त्यांने शेअर केला आहे. एका टीव्ही शोरुमसमोर काही गरीब मुलं टाव्ही पाहत असल्याचे दिसत आहे. यावेळी शोरुममध्ये काम करणारा एक सेल्समन बाहेर येऊन त्या मुलांची चौकशी करतो, आणि त्या मुलांच्या आवडीचे चॅनेल लावतो. हे पाहून ती मुलं आश्चर्य चकीत होतात, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हा व्हिडिओ गौतम त्रिवेदी नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्यांने शेअर केला आहे. या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. अशा लोकांच्यामुळे जग खूप सुंदर आहे. 

गेल्या काही दिवसापासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ तमिळनाडू येथील आहे.  

Web Title: viral news tv store employee wins heart after he played kids favorite cartoon viral