अरे बापरे! गुगल मॅपचा नाद केला अन् थेट दरीत कोसळला; थोडक्यात वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 03:36 PM2023-02-09T15:36:05+5:302023-02-09T15:37:44+5:30

गुगल मॅप जेवढे आपल्या फायद्याच आहे, तेवढच ते तोट्याचही आहे. आपण प्रवासासाठी   कुठेही गेल्यानंतर गुगल मॅपचा वापर करतो.

viral news tourists followed google maps hortcut in joshimath rescued later from ditch | अरे बापरे! गुगल मॅपचा नाद केला अन् थेट दरीत कोसळला; थोडक्यात वाचला जीव

अरे बापरे! गुगल मॅपचा नाद केला अन् थेट दरीत कोसळला; थोडक्यात वाचला जीव

googlenewsNext

गुगल मॅप जेवढे आपल्या फायद्याच आहे, तेवढच ते तोट्याचही आहे. आपण प्रवासासाठी   कुठेही गेल्यानंतर गुगल मॅपचा वापर करतो. गुगल मॅपही ज्या ठिकाणी आपल्याला जायचे आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी जवळचा मार्ग दाखवते. पण, कधी कधी गुगल मॅप चुकीचा पत्ताही दाखवते. अशा अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. आताही अशीच एक घटना समोर आली आहे. उत्तराखंडमध्ये गेलेल्या एक व्यक्ती गुगल मॅपचा वापर करुन प्रवास करत असताना तो दरीत कोसळ्याची घटना समोर आली आहे. हे प्रकरण उत्तराखंड येथील जोशीमठचे आहे.

दिल्लीतील दोन तरुण सुट्टीसाठी उत्तराखंड येथे गेले होते. या तरुणांचा विष्णुप्रयागला जायचे नियोजन होते. पण, ते थेट दरीत कोसळले. वेळीच त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

दीपिका आणि अमित असं या तरुणांची नाव आहेत. उत्तराखंडला गेल्यावर अनेक ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. बुधवार, 8 फेब्रुवारी रोजी दोघांनी जोशीमठ येथील विष्णुप्रयागला जाण्याचे नियोजन केले. त्यामुळे मार्ग पाहण्यासाठी त्यांनी  गुगल मॅप उघडला. अॅपने त्यांना शॉर्टकट मार्ग दाखवला. या रस्त्यावर वाहन जाऊ शकत नव्हते. म्हणजेच, गुगल मॅपने सांगितले की तुम्ही या रोडवरुन पायी गेलात तर तुम्ही कमी वेळात विष्णुप्रयागला पोहोचू शकता.

मुलीसाठी काय पण..! डान्स स्टेप्स विसरू नये म्हणून बाप सोबतच नाचला, तुम्हीही कौतूक कराल

त्यामुळे हे दोघेही त्याच दिशेने चालत राहिले. दोन वर्षांपूर्वी विष्णुप्रयाग पूल तुटल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. तिथे जाऊन तुटलेला पूल पाहिला तेव्हा कळले की पलीकडे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यानंतरही त्यांनी तेथून जाण्याचा प्रयत्न केला. दोघेही विष्णुप्रयागजवळ पोहोचले,पण मध्येच त्यांचा तोल गेला आणि ते पुलावरुन दरीड कोसळले, आणि नदीच्या काठावर अडकले.

दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना स्थानिकांना समजली आणि त्यांनी तत्काळ एनडीआरएफ आणि पोलिसांना माहिती दिली. बचावकार्य सुरू करण्यात आले आणि सुमारे तीन तासांनंतर दोन्ही पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. 

Web Title: viral news tourists followed google maps hortcut in joshimath rescued later from ditch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.