शेअर मार्केट आजच्या घडीला एक असं माध्यम आहे, या माध्यमातून काही वेळातच एखादी व्यक्ती लखपती होते तर काहीजण पैसेही गमवतात. शेअर मार्केटमध्ये सध्या गुंतवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, हे प्रमाण आधी एवढे जास्त नव्हते. आपल्या आजोबा, पंजोबांनी केलेल्या गुतंवणुकीचा आता त्यांच्या नातवांना फायदा होत आहे.
पाकिस्तान ट्रेन हायजॅक: लष्कराचा १०४ जणांना वाचविल्याचा दावा, बलुच आर्मीचा सोडल्याचा दावा
सध्या असंच एक प्रकरण चंदीगडमधून समोर आले आहे. येथे एका व्यक्तीला घराची साफ सफाई करत असताना १९९८ मध्ये मधील शेअरची पावती सापडली आहे. या पावतीमुळे आता त्या व्यक्तीला ११ लाख रुपये मिळणार आहेत.
चंदीगडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचे नशीब अचानक पालटले आहे. एका व्यक्तीला घराची साफ सफाई करत असताना शेअर मार्केटची एक पावती सापडते. तो व्यक्ती ती पावती व्यवस्थित पाहतो. तर ही पावती रिलायन्सच्या शेअरची असते. त्या पावतीची तो व्यक्ती माहिती घेतो तर त्याला समजते की १९९८ मध्ये त्याच्या आजोबांनी रिलायन्सचे शेअर घेऊन ठेवले होते.
१९९८ मध्ये त्या व्यक्तीच्या आजोबांनी हे शेअर ३० इक्विटी शेअर्स १० रुपये प्रति शेअर दराने खरेदी करण्यात आले होते. त्या आजोबांचे आता निधन झाले आहे. आज या शेअरची किंमत ११ लाख रुपये झाली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केली
चंदीगडमधील त्या व्यक्तीचे नाव ढिल्लो असं आहे. त्याला शेअर मार्केटची माहिती कमी आहे. यामुळे त्यानी ही पावती सोशल मीडियावर शेअर केली. या पावतीचे पुढे काय करायचे असा प्रश्न केला. त्याने ११ मार्च रोजी सकाळी ९ वाजता ही पोस्ट केली आणि काही वेळातच ते व्हायरल झाले. आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोकांनी ते पाहिले आहे आणि अनेक लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही वापरकर्त्यांनी शेअरची सध्याची किंमत पाहिली आणि सांगितले की तीन स्टॉक स्प्लिट आणि दोन बोनसनंतर, त्यांचे ३० शेअर्स आता ९६० पर्यंत वाढले आहेत, याची किंमत सुमारे ११ ते १२ लाख रुपये आहे.
या पोस्टवर नेटकऱ्यांनी गमतीशीर कमेंट केल्या आहेत. काहींनी घर नीट शोधा, तुम्हाला एमआरएफचे काही जुने शेअर्सही सापडतील. काही लोकांनी त्याला संबंधित कंपनीला ईमेल करून हे शेअर्स डीमॅट करून घेण्यासाठी आणि त्यांनी सांगितलेल्या प्रक्रियेनुसार ते डिजिटल स्वरूपात त्याच्या डीमॅट खात्यात ट्रान्सफर करण्यास सुचवले.