विद्यार्थ्याने प्राध्यापिकेसोबत वर्गातच उरकलं लग्न? नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 20:13 IST2025-01-29T20:07:57+5:302025-01-29T20:13:28+5:30
पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

विद्यार्थ्याने प्राध्यापिकेसोबत वर्गातच उरकलं लग्न? नेमकं प्रकरण काय?
पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नादिया जिल्ह्यातील हरिघाटा येथील मौलाना अबुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मानसशास्त्र वर्गात एका प्राध्यापीकेने विद्यार्थ्यासोबत वर्गातच लग्न केल्याचे समोर आले आहे. याबाबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. विद्यार्थी पहिल्या वर्षातच शिकत आहे. प्राध्यापक आणि विद्यार्थी एकमेकांच्या गळ्यात फुलांचे हार घालतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
धक्कादायक! दोन दिवसांच्या बाळाला एक्सपायर ग्लुकोज दिले, मृत्यू झाला; दोन नर्स निलंबीत
सोशल मीडियावर या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. हे लग्न खरे आहे की मजेत फोटो आणि व्हिडीओ काढले आहेत? अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने यावर कारवाई केली आहे. त्या विभागाच्या विभाग प्रमुखांना रजेवर पाठवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या फोटो आणि व्हिडिओमुळे हा गोंधळ उडाला आहे तो अबुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापीठाच्या हरिघाटा कॅम्पसमधील 'अप्लाईड सायकॉलॉजी' विभागाच्या प्रमुख आणि प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याचा आहे.
मंगळवारी हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे.महिला प्राध्यापकाच्या हातात गुलाबाच्या फुलांचा हार होता. पहिल्या वर्षाच्या एका विद्यार्थ्याने वर्गातच लग्न केले.त्या दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. लग्नात ज्या पद्धतीने कपडे परिधान केले जातात त्या पद्धतीने त्या दोघांनी कपडे परिधान केले होते. ही घटना वर्गातील इतर विद्यार्थ्यांनीही पाहिली. त्यापैकी काहींनी फोटो काढले, काहींनी व्हिडीओ बनवले, ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर वादविवाद सुरू झाला.
व्हिडीओ पाहिल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने विभागप्रमुख कम प्राध्यापकांना तात्काळ रजेवर पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. तो विद्यार्थीही बेपत्ता आहे.
अभिनय असल्याचे दिले स्पष्टीकरण
या घटनेबाबत आता विद्यापीठ प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. कुलगुरू तापस चक्रवर्ती यांनी सांगितले की, विभागप्रमुखांविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांना वर्गात त्यांच्या वर्तनाचे स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे. यावेळी त्या प्राध्यापीकेने हा एक अभिनय असल्याचे स्पष्टीकरण दिल्याचे कुलगुरुंनी सांगितले.
जर अभिनय होता तर मग विद्यापीठ प्रशासनाने संबंधीत प्राध्यापकांना रजेवर का पाठवले? याबाबचच अजूनही विद्यापीठाने स्पष्टीकरण दिलेले नाही.
बंगाल के नदिया जिले में स्थित मौलाना अबुल कलाम आजाद प्रौद्योगिकी विश्वविद्यालय की प्रोफेसर ने फर्स्ट ईयर के छात्र से क्लासरूम में ही शादी रचा ली। वीडियो वायरल हुआ, तो यूनिवर्सिटी प्रशासन ने प्रोफेसर को छुट्टी पर भेज दिया। pic.twitter.com/aUTybYxJ0t
— Swaraj Srivastava (@SwarajAjad) January 29, 2025