लॉकअपमध्ये कैद्याने गायले 'मुझे पीने का शौक नहीं...,' महिला कॉन्स्टेबलची प्रतिक्रिया झाली व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 19:50 IST2022-11-28T19:50:08+5:302022-11-28T19:50:41+5:30
तुरुंगात गेल्यानंतर कैदी आपल्या सुटकेसाठी देवाकडे प्रार्थना करत असतात. तर काही कैदी पोलिसांना बाहेर सोडण्यासाठी विनंती करत असतात.

लॉकअपमध्ये कैद्याने गायले 'मुझे पीने का शौक नहीं...,' महिला कॉन्स्टेबलची प्रतिक्रिया झाली व्हायरल
तुरुंगात गेल्यानंतर कैदी आपल्या सुटकेसाठी देवाकडे प्रार्थना करत असतात. तर काही कैदी पोलिसांना बाहेर सोडण्यासाठी विनंती करत असतात. आपल्या सुटकेसाठी सर्वजण प्रयत्न करत असतात, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक कैदी चक्क गाणे गात असल्याचे दिसत आहे, यात त्याच्या चेहऱ्यावर कोणतीच भीती दिसत नाही, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
स्कीन कॅन्सरच्या जनजागृतीसाठी २५०० लोक जेव्हा नग्न आंदोलन करतात, ऑस्ट्रेलियातील अनोखी घटना..
हा व्हिडिओ तीन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने त्याच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला होता. पण पुन्हा एकदा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरता येत नाही. हा व्हिडिओ 18 नोव्हेंबरला एका इंस्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला होता, ज्याला आतापर्यंत 55 हजार लाईक्स आणि शेकडो लाईक्स मिळाले आहेत. कॅप्शनमध्ये लिहिले होते - हे देखील ठीक आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. 'हा दिलजला प्रेमी आहे' असे दिसते.
या व्हायरल व्हिडिओमध्ये, लॉक-अपमधील एका कैदीला अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या 'कुली' चित्रपटातील 'मुझे पीने का शोख नहीं पीता हु गम भुलाने को...' हे प्रसिद्ध गाणे गाताना दिसत आहे. त्या व्यक्तीला गाताना पाहून पोलीस हसताना दिसत आहेत. पोलीस ठाण्याच्या समोर एक महिला कॉन्स्टेबलही उभी राहून त्या कैद्याकडे बघते आणि त्याचे गाणे ऐकून तिला हसू आवरता येत नसल्याचे दिसत आहे.