शिक्षिकेने 'पतली कमरिया मोरी...'वर केला भन्नाट डान्स, विद्यार्थी म्हणू लागले हाय..हाय; व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2022 14:22 IST2022-12-04T14:21:21+5:302022-12-04T14:22:45+5:30

सध्या सोशल मीडियावर अनेक प्लॅटफॉर्म आले आहेत. सोशल मीडियाच्या दुनियेत रोज एक नवा ट्रेंड येत असतो. यावर इन्स्टाग्रावर भन्नाट व्हिडिओ पोस्ट केले जातात.

viral news patli kamariya mori teacher dances with students on desi song in classroom | शिक्षिकेने 'पतली कमरिया मोरी...'वर केला भन्नाट डान्स, विद्यार्थी म्हणू लागले हाय..हाय; व्हिडिओ व्हायरल

शिक्षिकेने 'पतली कमरिया मोरी...'वर केला भन्नाट डान्स, विद्यार्थी म्हणू लागले हाय..हाय; व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर अनेक प्लॅटफॉर्म आले आहेत. सोशल मीडियाच्या दुनियेत रोज एक नवा ट्रेंड येत असतो. यावर इन्स्टाग्रावर भन्नाट व्हिडिओ पोस्ट केले जातात. काही दिवसापूर्वी 'मेरा दिल ये पुकारे आजा...'वरील पाकिस्तानी तरुणी आयशाचा डान्स व्हायरल झाला होता. नेटकरी 'इन्स्टाग्रामवर याच गाण्यावर रील बनवू लागले. आता एक भोजपुरी गाणे लता मंगेशकर यांच्या रिमिक्स गाण्यावर रिल्स बनवत आहेत. यावर काही विद्यार्थ्यांनी रील बनवला आहे.  यात शिक्षिकेचाही समावेश आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

@Gulzar_sahab या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 'लहानपणी असे शिक्षक का मिळाले नाहीत,अशी कॅप्शन या व्हिडिओला दिली आहे. 

आतापर्यंत या व्हिडिओला ३ लाख व्ह्यूज आणि ८ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर अनेकांनी कमेंटही केली आहे. आजकाल मुलं असोत की शिक्षक, प्रत्येकजण इन्स्टाग्रामवर रील बनवत असतो. तर काहींनी ते योग्य नसल्याचे सांगितले आहे. मुलांना शिकायला लावा, हाय हाय नाही…. अशी कमेंट केली आहे. 

Web Title: viral news patli kamariya mori teacher dances with students on desi song in classroom