Viral News: इंटरनेटने पालटले आयुष्य; रस्त्यावर फुगे विकणारी मुलगी रातोरात बनली इंटरनेट सेंसेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 09:49 IST2022-03-08T09:49:23+5:302022-03-08T09:49:59+5:30
अर्जुन कृष्णन नावाच्या फोटोग्राफरने या मुलीला केरळमधील अंदलूर कावू महोत्सवात पाहिले, तिथे त्याने तिचे काही फोटो क्लिक केले.

Viral News: इंटरनेटने पालटले आयुष्य; रस्त्यावर फुगे विकणारी मुलगी रातोरात बनली इंटरनेट सेंसेशन
इंटरनेट एक अशी जागा आहे, जिथं एका रात्रीत कुणीही फेमस होऊ शकतं. इंटरनेटने रानू मंडल, 'बचपन का प्यार' वाला सहदेव दिर्डो किंवा 'कच्च्या बदामा'चा गायक भुबन बद्यकर यांसारख्या लोकांना रातोरात लोकप्रिय केलं. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. केरळमध्ये गर्दीच्या ठिकाणी फुगे विकणारी मुलगी एका वेडिंग फोटोग्राफरने केलेल्या फोटोशूटसाठी मॉडेलिंग करताना इंटरनेट स्टार बनली.
एका जत्रेत फुगे विकताना दिसली
अर्जुन कृष्णन नावाच्या फोटोग्राफरने केरळमधील अंदलूर कावू महोत्सवात या मुलीला पाहिलं होतं. तिथं त्यानं तिचे काही फोटो क्लिक केले. अर्जुनने ते फोटो मुलीला आणि तिच्या आईलाही दाखवले. फोटो पाहून दोघीही खूप खुश दिसत होत्या. किस्बू नावाची मुलगी राजस्थानी कुटुंबातील असून ती केरळमध्ये फुगे विकत होती.
अर्जुनने त्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले, त्या फोटोंना मिळालेला प्रतिसाद जबरदस्त होता. त्याचा मित्र श्रेयसनेही किस्बूचा फोटो काढला, जो काही वेळातच व्हायरल झाला. उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, कोणीतरी किस्बूच्या कुटुंबाशी संपर्क साधून त्यांच्यासाठी मेकओव्हर फोटोशूट करुन घेतले.
रातोरात बनली फेमस
लाल ब्लाउजसह सुंदर कासवू साडी नेसून किस्बूनेही पारंपारिक मेकओव्हर केला. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. या फोटोंमुळे किस्बू एका रात्रीत इंटरनेट सेंसेशन बनली. तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अनेकजण तिच्या या मेकओव्हरचे कौतुक करत आहेत. फोटोशूटला मिळालेल्या प्रतिसादामुळे अर्जुन कृष्णन खूप उत्साहित आणि खूप खूश आहे.