अरे बापरे! रेल्वेने थेट बजरंगबलींना नोटीस बजावली, कारवाईचा दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 13:50 IST2023-02-12T13:46:06+5:302023-02-12T13:50:26+5:30
मध्यप्रदेशमध्ये भारतीय रेल्वेने एक अजब नोटीस प्रसिद्ध केली आहे, रेल्वेने मंदिरातील विराजमान असलेल्या भगवान बजरंग बली यांना नोटीस बजावली आहे.

अरे बापरे! रेल्वेने थेट बजरंगबलींना नोटीस बजावली, कारवाईचा दिला इशारा
मध्यप्रदेशमध्ये भारतीय रेल्वेने एक अजब नोटीस प्रसिद्ध केली आहे, रेल्वेने मंदिरातील विराजमान असलेल्या भगवान बजरंग बली यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या नोटीसमध्ये अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच हे अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना करण्यात आली असून कारवाईचा इशाराही दिला आहे.
हिंमतीला कडक सॅल्यूट! डिलिव्हरी बॉयच्या धाडसाचं तुम्हीही कराल कौतुक; Video तुफान व्हायरल
सध्या ग्वाल्हेर-श्योपूर ब्रॉडगेज लाइनचे काम सुरू आहे. भगवान हनुमानजींचे मंदिर मोरेना जिल्ह्यातील सबलगड तहसीलमध्ये ब्रॉडगेज लाइनच्या मध्यभागी येत आहे. हे मंदिर रेल्वेची जमीन असल्याचेही सांगितले जात आहे, त्यामुळे भारतीय रेल्वेने भगवान बजरंगबली यांनाच नोटीस बजावली आहे. तशी नोटीसही मंदिराला देण्यात आली आहे.
या नोटीसमध्ये भगवान हनुमानजींना लिहिले आहे की, तुम्ही रेल्वेच्या जमिनीवर मंदिर बांधून अतिक्रमण केले आहे, ते 7 दिवसांत हटवा, अन्यथा आवश्यक कारवाई केली जाईल. ही नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसांच्या आत रेल्वेच्या जमिनीवर केलेले अतिक्रमण काढून रेल्वेची जागा रिकामी करा, अन्यथा प्रशासन तुमच्याकडून केलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई करेल, असं या नोटीसमध्ये म्हटले आहे. बजरंग बाली यांना दिलेल्या या नोटीसची प्रत सहाय्यक विभागीय अभियंता ग्वाल्हेर आणि जीआरपी स्टेशन प्रभारी ग्वाल्हेर यांनाही पाठवण्यात आली आहे. ही नोटीस सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.