बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 14:01 IST2025-08-22T13:56:35+5:302025-08-22T14:01:48+5:30
एक तरुण त्याच्या बेडवर झोपला होता. पहाटे लवकर उठला तर त्याला बेडवर एक ७ फुटांचा नाग दिसला.

बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
ओडिशामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, एका तुणाच्या बेडवर रात्रभर ७ फुटांचा नाग असल्याची घटना समोर आली. रात्रभर झोपेत या तरणाला काहीच जाणवले नाही. पण, पहाटे उठताच त्याला विषारी नाग दिसला. नागाला पाहताच त्याची झोप उडाली.
ही घटना ओडिशातील बरसाही पोलिस ठाणे परिसरातील रतापूर गावातील दहिसाही भागात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तरुण त्याच्या बेडवर झोपला होता आणि बेडवर मच्छरदाणी होती. सकाळी उठल्यावर त्याला बेडवर काहीतरी विचित्र दिसले.
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
त्याने लगेच बेडवरून उडी मारली आणि लाईट चालू केली. तसेच खिडकी आणि दरवाजा उघडला जेणेकरून बाहेरून येणारा नैसर्गिक प्रकाश देखील आत येऊ शकेल.
त्याने काळजीपूर्वक पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. ते विचित्र दिसणारा विषारी ७ फुटांचा विषारी नाग होता.
त्याने लगेच सर्पमित्रांना फोन केला. माहिती मिळताच, स्नेक हेल्पलाइन टीम घटनास्थळी पोहोचली आणि तरुणाच्या बेडवरून विषारी नागाला सुरक्षितपणे बाहेर काढले. तो नाग ७ फूट लांबीचा विषारी नाग होता.
नागाला वाचवायला गेला आणि स्वतःचाच जीव गमावला
जीवदान देणाऱ्या एका सर्पमित्राचा नागाला पकडत असताना मृत्यू झाला. कोब्रा प्रजातीच्या नागाला पकडत असताना नागाने दंश केला. यात सर्पमित्र जेपी यादव यांचा मृत्यू झाला.
राजापाकर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. रविवारी त्यांना कोब्रा नाग निघाल्याची माहिती देण्यात आली. जेपी यादव साप पकडण्यासाठी पोहोचले. ज्या ठिकाणी नाग निघाला होता, तिथे लोकांची गर्दी झाली होती.
पकडत असतानाच जेपी यादव यांच्या बोटाला नाग चावला. त्यानंतरही त्यांनी आधी त्याला डब्ब्यात बंद करण्याचा प्रयत्न केला. पण, नाग चावल्यानंतर काही मिनिटातच विषाचा परिणाम त्यांच्यावर दिसू लागला. ते आधी खाली बसले आणि त्यानंतर कोसळले.