शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

१०५ वर्ष जुन्या ट्रॅक्टरला भंगार समजत होते लोक, पण विकला गेला १.२५ कोटी रूपयांना; जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 12:16 IST

Viral News : साधारण १०५ वर्ष जुन्या या ट्रॅक्टरची किंमत अचानक आकाशाला भिडली आणि हा ट्रॅक्टर १.२५ कोटी रूपयांना विकला गेला. आता ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

Viral News : जुन्या गाड्यांना म्हणजेच व्हिंटेज कारना भरपूर किंमत मिळते हे आपण अनेकदा पाहिलंही असेल आणि ऐकलंही असेल. या जुन्या गाड्या अनेकांसाठी स्टेटसचा विषय असतात. कोट्यावधी रूपयांमध्ये या गाड्या विकल्या जातात. पण एखाद्या जुन्या ट्रॅक्टरा कोट्यावधी रूपये का मिळतील? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. जालंधरमध्ये एक जुना ट्रॅक्टर कोट्यावधी रूपयांना विकला गेलाय. येथील शहीद भगत सिंह चौकात अनेक दशकांपासून एक जुना ट्रॅक्टर पडलेला होता. भंगार समजून त्याकडे कुणी बघतही नव्हतं. लहान मुलं त्यावर खेळत होते. पण जेव्हा या ट्रॅक्टरचं सत्य समोर आलं तेव्हा सगळेच हैराण झाले. साधारण १०५ वर्ष जुन्या या ट्रॅक्टरची किंमत अचानक आकाशाला भिडली आणि हा ट्रॅक्टर १.२५ कोटी रूपयांना विकला गेला. आता ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

पंजाबमधील जालंधर येथे शहीद भगत सिंह चौक जवळ एका जीर्ण इमारतीजवळ हा ट्रॅक्टर अनेक वर्षे तसाच उभा होता. त्याचे टायर पूर्णपणे झिजलेले होते आणि बॉडीवर जंगाचा जाड थर चढलेला होता. अवस्था इतकी खराब होती की लोक त्याला भंगारच समजत होते. तरीही त्याची धूर सोडणारी चिमणी सरळ उभी होती आणि स्टीयरिंग आपल्या जागेवर घट्ट बसलेले होते. विशेष म्हणजे, ज्यांनी लहानपणी या ट्रॅक्टरवर खेळ केला होता, त्यांच्या नातवंडांनीही त्याच ट्रॅक्टरवर खेळ केला; पण ही मशीन मात्र वर्षानुवर्षे तिथेच उभी राहिली.

व्हायरल व्हिडिओने बदलली किंमत

सुमारे अडीच महिन्यांपूर्वी एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने या ट्रॅक्टरचा व्हिडीओ बनवून पोस्ट केला. व्हिडीओ व्हायरल होताच तो खरेदी करण्यासाठी सतत फोन येऊ लागले. नगरसेवक पुनीत वढेरा यांच्या मते, सुरुवातीला मुंबईतील एका कंपनीने केवळ २ लाख रुपयांची ऑफर दिली होती. पण रस वाढताच बोली झपाट्याने वाढली आणि दुसऱ्याच दिवशी ती २८ लाख रुपयांपर्यंत पोहोचली. अखेर १७ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिकेत राहणाऱ्या मालकाने हा ट्रॅक्टर १.२५ कोटी रुपयांना विकला. त्यामुळे हा सौदा संपूर्ण इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला.

इतका खास का आहे हा जर्मन ट्रॅक्टर?

हा काही साधा ट्रॅक्टर नाही, तर जर्मनीतील मॅनहाइम येथे तयार झालेला व्हिंटेज ‘लँज बुलडॉग HL-12’ ट्रॅक्टर आहे, जो सुरुवातीच्या यशस्वी ट्रॅक्टरांपैकी एक मानला जातो. त्याच्या बाजूला LANZ आणि मागील बाजूला हेनरिक लांज़ मॅनहाइम असे लिहिलेले होते. १९२१ साली डॉ. फ्रिट्ज़ ह्यूबर यांनी सादर केलेला हा ट्रॅक्टर हॉट-बल्ब इंजिन तंत्रज्ञानावर चालत असे. तो कच्चे तेल तसेच विविध प्रकारच्या इंधनावर काम करू शकत होता. ही अनोखी अभियांत्रिकी रचना आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व यामुळेच हा ट्रॅक्टर आज कलेक्टर्ससाठी अत्यंत मौल्यवान ठरला आहे. आता हा ट्रॅक्टर कॅलिफोर्नियाच्या म्युझिअममध्ये ठेवण्यात येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 105-Year-Old Tractor Sold for $150,000 After Being Mistaken for Scrap

Web Summary : A 105-year-old Lanz Bulldog tractor, once considered scrap in Jalandhar, was sold for $150,000 after a viral video revealed its value. The vintage German tractor, a historical piece of engineering, will now be displayed in a California museum.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके