१४ महिन्यांची लव्ह स्टोरी, या गावातील तरुणासाठी तरुणी अमेरिका सोडून आली भारतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:19 IST2025-04-09T16:58:50+5:302025-04-09T17:19:50+5:30
अमेरिकेतील एक तरुणी आपल्या प्रियकरासाठी अमेरिका सोडून भारतात आली आहे.

१४ महिन्यांची लव्ह स्टोरी, या गावातील तरुणासाठी तरुणी अमेरिका सोडून आली भारतात
एका अमेरिकन महिलेने तिच्या आयुष्यातील प्रेमाशी लग्न करण्यासाठी हजारो मैलांचा प्रवास केला आहे. ज्या पुरूषावर ती स्त्री प्रेमात पडली तो आंध्र प्रदेशातील एका दुर्गम गावातून येतो. अमेरिकन महिला जॅकलिन फोरेरो एक छायाचित्रकार आहे आणि तिला चंदनाच्या प्रेमात पडले आहे. त्या महिलेची चंदनशी इंस्टाग्रामवर मैत्री झाली आणि दोघांमध्ये खूप गप्पा झाल्या.
आपण अनेक प्रेमकथा ऐकल्या आहेत. प्रेमासाठी कोणीही काहीही करत असते. कण घरदार सोडते, तर कोण आपला देश सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होते. सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका अमेरिकन तरुणीबाबत अशीच एक रंजक गोष्ट समोर आली आहे.
अहो काका, तिथं मंत्रालय लिहिलंय मूत्रालय नाही; उघड्यावर लघवी करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल
एका अमेरिकन महिलेने प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी हजारो मैलांचा प्रवास केला आहे. ज्या तरुणाच्या ती स्त्री प्रेमात पडली तो आंध्र प्रदेशातील एका दुर्गम गावातील आहे.
अमेरिकन महिला जॅकलिन फोरेरो एक छायाचित्रकार आहे,ती चंदनच्या प्रेमात पडली. त्या महिलेची चंदनशी इंस्टाग्रामवर मैत्री झाली, नंतर हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली. त्या तरुणाच्या इंस्टाग्राम प्रोफाइलमधील साधेपणा पाहून ती तरुणी त्याच्या प्रेमात पडली.
या पद्धतीने सुरू झाली लव्हस्टोरी
या दोघांची लव्हस्टोरी एका साध्या 'हाय' ने सुरू झाली. ते एका हृदयस्पर्शी संभाषणात बदलली. पुढच्या १४ महिन्यांत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हे दोघही आता लग्न करण्याच्या विचारात आहेत.
याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये, फोरेरोने लिहिले की, "१४ महिने एकत्र आणि एका मोठ्या नवीन अध्यायासाठी सज्ज." ४५ सेकंदांचा व्हिडीओ शेअर करताना, तरुणीने एक साधा संदेश अतूट बंधनात कसा बदलला हे स्पष्ट केले, तिने लिहिले, 'मी प्रथम चंदनला मेसेज केला.' त्याच्या प्रोफाइलवरून मला कळले की तो एक उत्साही ख्रिश्चन माणूस होता.
जॅकलिन चंदनपेक्षा ९ वर्षांनी मोठी
जॅकलिन स्वतः चंदनपेक्षा ९ वर्षांनी मोठी आहे, त्यांची ओळख इंस्टाग्राम मेसेज आणि व्हिडीओ कॉलद्वारे झाली. ७ महिन्यांतच, जॅकलीन त्याच्याशी लग्न करण्यासाठी भारतात आली.