VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 10:44 IST2025-10-09T10:42:49+5:302025-10-09T10:44:19+5:30
भर रस्त्यात सुरू असलेल्या एका हाय-व्होल्टेज फॅमिली ड्रामाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भर रस्त्यात सुरू असलेल्या एका हाय-व्होल्टेज फॅमिली ड्रामाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने तिच्या पती आणि त्याच्या प्रेयसीला मारहाण केली आहे. ही घटना महाराजपूर पोलिस स्टेशन परिसरातील नरवाल मोडजवळ घडली. मंगळवारी एका हॉटेलबाहेर पती, पत्नी आणि पतीच्या कथित प्रेयसीमध्ये जोरदार वाद झाला. हा हाय-व्होल्टेज ड्रामा जवळजवळ एक तास सुरू होता.
महाराजपूरमधील एका गावात राहणाऱ्या एका महिलेने सांगितले की, तिचे लग्न २०१८ मध्ये झाले होते आणि तिला तीन मुले आहेत. तर, तिचा राजकोटमध्ये राहून काम करत होता. तिचा पती दिवाळीसाठी दोन दिवस आधीच घरी परतला होता. मंगळवारी सकाळी तो त्याच्या कथित प्रेयसीला भेटण्यासाठी नरवाल मोरे येथील एका हॉटेलमध्ये गेला होता. पतीवर संशय आल्याने पत्नी देखील त्याच्या मागे हॉटेलमध्ये गेली. यावेळी तिने आपल्या पतीला प्रेयसीसोबत हातात हात घालून हॉटेलमधून बाहेर पडताना पाहिले, ज्यामुळे ती प्रचंड संतापली.
पत्नीने आरोप केला की, तिचा पती गेल्या तीन वर्षांपासून त्या महिलेसोबत प्रेमप्रकरण करत होता आणि तिने त्यांना यापूर्वी अनेक वेळा रंगेहाथ पकडले होते. आता देखील दोघांना हॉटेलबाहेर बघितल्यावर तिचा पारा चढला आणि हॉटेलबाहेरच त्यांची बाचाबाची सुरू झाली. दोन्ही बाजूंमधील शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. पत्नीने पतीच्या मैत्रिणीलाच मारहाण केली नाही तर, दोघींचे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला देखील तिने मारहाण केली.
हाय कलयुग: 7 वचन देकर जिसके साथ 7 फेरे लिए जीवन संगिनी बनाया उसे बीच सड़क प्रेमिका से पिटवाया... #VideoViral
— Rahul Saini (@JtrahulSaini) October 8, 2025
यूपी के कानपुर में प्रेमिका के साथ पति को होटल से निकलते ही पत्नी ने रंगे हाथों पकड़ लिया..!
नोंकझोंक हुई _ गाली गलौज हुआ फिर पति ने प्रेमिका से पत्नी को सरेआम पिटवा… pic.twitter.com/GWbcwsClz2
या घटनेदरम्यान, दोन्ही महिलांनी एकमेकींचे केस ओढले. भर रस्त्यात या कुटुंबाची हाणामारी सुरू होती. हा गोंधळ पाहण्यासाठी रस्त्याने जाणाऱ्यांची गर्दी जमली आणि काहींनी या घटनेचे चित्रीकरणही केले.
यावेळी घटनास्थळी पोलीस अधिकारी देखील होते. तब्बल एक तास हा गोंधळ सुरू राहिल्यानंतर, रस्त्याने जाणाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली आणि पतीला तेथून हाकलून लावले. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात कोणतीही लेखी तक्रार आलेली नाही. या व्हायरल व्हिडीओची चौकशी केली जात आहे आणि तक्रार आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.