VIRAL : तो नवरा आहे गं, महिषासुर नाही... करवा चौथची पूजा करण्यासाठी महिलेनं काय केलं, Video बघाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:09 IST2025-10-07T13:08:26+5:302025-10-07T13:09:00+5:30
करवा चौथ जवळ आलेला असतानाच व्हायरल होत असलेला असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, ज्यातील महिलेचा करवा चौथ साजरी करण्याचा हटके अंदाज पाहून तुम्ही हसून लोटपोट व्हाल!

VIRAL : तो नवरा आहे गं, महिषासुर नाही... करवा चौथची पूजा करण्यासाठी महिलेनं काय केलं, Video बघाच!
पतीच्या दीर्घायुष्यासाठी ठेवला जाणारा 'करवा चौथ'चा उपवास हा भारतात विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. पण सोशल मीडियाच्या या जमान्यात काही जण लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी या पवित्र सोहळ्यालाही स्टंटबाजीचं रूप देत आहेत. करवा चौथ जवळ आलेला असतानाच व्हायरल होत असलेला असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, ज्यातील महिलेचा करवा चौथ साजरी करण्याचा हटके अंदाज पाहून तुम्ही हसून लोटपोट व्हाल!
पतीलाच बनवलं स्टूल
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला लाल रंगाची पारंपरिक साडी नेसून करवा चौथची पूजा करताना दिसत आहे. पूजेचा विधी सुरू असताना, चंद्र दिसल्यानंतर ती चाळणीतून आधी चंद्राला आणि नंतर पतीला पाहते. मात्र, तिचा अंदाज पूर्णपणे हटके आहे.
या व्हिडीओसाठी ही महिला थेट आपल्या पतीच्या मानेवर पाय ठेवून उभी राहते. खाली बिचारा पती उभा आहे आणि पत्नी पूर्ण आत्मविश्वासाने एक पाय त्याच्या मानेवर आणि एक मांडीवर ठेवून बॅलन्स साधत उभी आहे. याच हवाई स्टाईलमध्ये ती चाळणीतून आधी चंद्र पाहते आणि मग खाली उभ्या असलेल्या आपल्या पतीला पाहते.
'तो महिषासुर नाही...' नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स!
करवा चौथच्या या अनोख्या स्टंटला पाहून सोशल मीडियावर लोकांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओवर आलेल्या फनी कमेंट्स वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
एका युझरने कमेंट केली की, "अहो ताई, तो तुमचा पती आहे, 'महिषासुर' नाही!" तर दुसऱ्या एका युझरने विचारले की, "ही पूजा सुरू आहे की, आखाड्यात कुस्ती?" आणखी एकाने अशीच गंमत करत लिहिले की, "केवळ रील बनवण्याच्या नादात काही लोकांनी तर धर्माची थट्टाच केली आहे." लाखों लोकांनी पाहिलेला आणि मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंगचा विषय ठरला आहे.