VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 18:00 IST2025-09-17T17:58:30+5:302025-09-17T18:00:08+5:30
एका ग्राहकाने ऑर्डर केलेल्या वस्तूची डिलिव्हरी थेट महिंद्रा थार सारख्या आलिशान गाडीतून झाली, याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
आजकाल ऑनलाइन फूड आणि वस्तूंची डिलिव्हरी बाईक किंवा सायकलवरून होताना दिसते. पण, एका ग्राहकाने ऑर्डर केलेल्या वस्तूची डिलिव्हरी थेट महिंद्रा थार सारख्या आलिशान गाडीतून झाली, तेव्हा तो ग्राहक पुरता अवाक झाला. या अनोख्या डिलिव्हरीचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
'divyagroovezz' नावाच्या ब्लिंकिटच्या ग्राहकाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तो चकित होऊन, "अरे बापरे, हा थारमधून डिलिव्हरी करायला आलाय?" असे बोलताना दिसत आहे. ब्लॅक रंगाची थार गाडी ग्राहकाच्या घरासमोर थांबते आणि त्यातून डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन बाहेर येतो, असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
ब्लिंकिट इतका पगार देतोय का?
ग्राहकाने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत गंमतीने लिहिले की, "ब्लिंकिट आपल्या डिलिव्हरी एजंट्सना इतका पगार देतोय का? की महिंद्रा कंपनीची गाडी इतकी स्वस्त झालीये?"
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक मजेशीर कमेंट्स येत आहेत. अनेक नेटिझन्सनी अंदाज लावला आहे की, कदाचित हा डिलिव्हरी बॉय त्याच्या स्वतःच्या गाडीचा वापर करत असेल किंवा इतर काही कारणांमुळे त्याला थारचा वापर करावा लागला असेल.
नेटकरी म्हणाले..
एका युझरने कमेंट केली की, "कदाचित तो त्या ब्लिंकिट स्टोअरचा मालक असेल आणि त्याला स्वतःच डिलिव्हरी करावी लागली असेल." तर दुसऱ्या एका युझरने लिहिले की, "काही लोक केवळ अनुभवासाठी किंवा टाइमपास म्हणून असे काम करतात. मी एका स्कॉर्पिओच्या मालकाला भेटलो होतो, जो डिलिव्हरीचे करत होता."
या प्रकरणावर अजून तरी ब्लिंकिटकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, पण हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.