बोंबला! मॉल आउटलेटमध्ये विकलं जात आहे बासमती तांदळाच्या पोत्याचं जॅकेट, किंमत पाहून उडेल झोप...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:51 IST2025-05-27T15:50:30+5:302025-05-27T15:51:00+5:30
Viral Video : तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल की, तांदळाच्या पोत्यापासून एक जॅकेट बाजारात विकायला आलं आहे.

बोंबला! मॉल आउटलेटमध्ये विकलं जात आहे बासमती तांदळाच्या पोत्याचं जॅकेट, किंमत पाहून उडेल झोप...
Viral Video : फॅशनच्या विश्वात सतत काहीना काही नवीन प्रयोग होत असतात. कधी हे प्रयोग लोकांना आवडतात, तर कधी त्यावर संतापही व्यक्त केला जातो. तर कधी कधी अशीही फॅशन समोर येते ज्याबाबत लोक विचारात पडतात. सोशल मीडियावर विचित्र फॅशन ट्रेंड्सचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. बरं फॅशन तर अजब असतेच, तरीही त्यांची किंमत इतकी असते की आकडा बघून झोप उडावी. असाच एक फॅशन प्रयोग सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल की, तांदळाच्या पोत्यापासून एक जॅकेट बाजारात विकायला आलं आहे.
फॅशनच्या विश्वात होणारे प्रयोग फारच अजब असतात, जे मॉल्स आणि फॅशन आउटलेट्समध्ये बघायला मिळतात. लोकांना वेगवेगळ्या डिझाइनचे कपडे घालणं आवडतं. पण कधी कुणी पोत्यापासून तयार जॅकेट घालेल का? असा प्रश्न पडतो.
बासमती तांदळाच्या पोत्याचं जॅकेट
या व्हिडिओत जे जॅकेट तुम्हाला दिसत आहे, ते हेच आहे. एक पोतं कापून हे जॅकेट शिवल्याचं दिसत आहे. ज्यावर जाहिराती होती. जॅकेटवर रॉयल लिहिलं होतं आणि ते एका बासमती तांदळाच्या पोत्यापासून तयार करण्यात आलंय. व्हिडिओत एक तरूणी एका आउटलेटमध्ये ठेवलेलं हे जॅकेट ट्राय करताना दिसत आहे.
किंमत वाचून उडेल झोप
व्हिडिओवर आपल्याला 2000 डॉलर म्हणजे 70 हजार रूपये बासमती कोट असं लिहिलेलं दिसत आहे. तरूणी एका दुसऱ्या तरूणीसोबत बोलत आहे. दुसरी अंदाज लावते की, हे बासमतीच्या पोत्यापासून तयार जॅकेट कदाचित 300 डॉलरला असेल. तर तरूणी हसत हसत सांगते की, हे जॅके 2000 डॉलरला आहे.
हा व्हिडीओ इन्स्टावर @thanos_jatt नावाच्या यूजरनं पोस्ट केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 18 लाख व्ह्यूज मिळाले आहेत आणि 647 लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरनं कॅप्शनमध्ये गमतीनं लिहिलं की, 'लाइनमध्ये पुढील नंबर आशीर्वाद पिठाचा आहे'.