VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:16 IST2025-09-25T16:15:23+5:302025-09-25T16:16:04+5:30
तुम्ही कधी एका भिंतीसारखं दिसणारं घर पाहिलं आहे का? नाही ना? पण, या जगात अनेक अजब गोष्टी आहेत.

VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
तुम्ही कधी एका भिंतीसारखं दिसणारं घर पाहिलं आहे का? नाही ना? पण, या जगात अनेक अजब गोष्टी आहेत. अशीच एक अजब गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. टोकियोमध्ये एका इमारतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याला 'जगातलं सर्वात बारीक अपार्टमेंट'म्हटले जात आहे. बाहेरून पाहिल्यावर ही तीन मजली इमारत फक्त एका भिंतीसारखी दिसते, पण आतून तिचे सौंदर्य आणि रचना पाहून तुम्ही थक्क व्हाल.
अतिशय लहान जागेत चार खोल्या!
टोकियोतील नेटिमा भागात असलेली ही अनोखी इमारत फक्त ११ चौरस मीटर म्हणजे ११९ चौरस फूट जागेत बांधली आहे. विशेष म्हणजे, इतक्या कमी जागेतही यात चार खोल्या, एक लहान किचन, एक शॉवर आणि एक बाथटबची सोय आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दाखवतो की, एका अतिशय अरुंद जिन्याने वरच्या मजल्यावर जावे लागते. या जिन्यावरून एका वेळी फक्त एकच व्यक्ती जाऊ शकते.
प्रसिद्ध यूट्यूबर ‘सुपर ब्लोंडी’ने जेव्हा या इमारतीचा व्हिडीओ शेअर केला, तेव्हा नेटकऱ्यांचे डोळे पांढरे झाले. व्हिडीओमध्ये बाथटबमध्ये जाण्याआधी तो म्हणतो, "मला नाही वाटत मी या बाथटबमध्ये मावेन." पण तरीही तो कसाबसा आत बसतो.
किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!
तुम्हाला वाटेल की, एवढ्या लहान घराची किंमत कमी असेल, तर तुमचा अंदाज चुकीचा आहे. यूट्यूबरच्या म्हणण्यानुसार, हे घर एका प्रसिद्ध आणि व्यस्त रस्त्यावर आहे, त्यामुळे त्याची किंमत खूप जास्त आहे. जरी हे घर अरुंद जागेत गुदमरल्यासारखे वाटणारे वाटत असले, तरी जपानसारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशात हे इंजिनिअरिंगचे एक उत्तम उदाहरण आहे.
या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण याला 'इमारत बांधणीचा एक अजब नमुना' म्हणत आहेत, तर काहीजण 'हे बघूनच मला गुदमरल्यासारखं वाटायला लागलं', असे कमेंट करत आहेत.