६० वर्षीय महिला जिंकली इडली खाण्याची स्पर्धा, व्हिडीओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 15:52 IST2019-10-02T15:45:35+5:302019-10-02T15:52:00+5:30
असा विचार करा की, इडली खाण्याची एक स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत तुम्हाला १ मिनिटात जास्तीत जास्त इडली खायच्या आहेत. तुम्ही किती इडली खाऊ शकाल?

६० वर्षीय महिला जिंकली इडली खाण्याची स्पर्धा, व्हिडीओ व्हायरल...
असा विचार करा की, इडली खाण्याची एक स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत तुम्हाला १ मिनिटात जास्तीत जास्त इडली खायच्या आहेत. तुम्ही किती इडली खाऊ शकाल? एक, दोन फार फार तर तीन....पण कर्नाटकातील एका ६० वर्षीय महिलेने एका मिनिटात एक-दोन नाही तर चक्क सहा इडली फस्त केल्या. या स्पर्धेत ही महिला पहिली आली.
रिपोर्ट्सनुसार, म्हैसूरमध्ये नवरात्री निमित्ताने इडली खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा खासकरून महिलांसाठी आयोजित करण्यात आली होती. एका मिनिटात सहा इडली फस्त करणाऱ्या या महिलेचं नाव सरोजम्मा असं आहे.
म्हैसूरमध्ये इडली खाण्याची स्पर्धा दसऱ्यापर्यंत दहा दिवस चालते. यात वेगवेगळ्या स्पर्धाही घेतल्या जातात. लोक येतात, खातात. त्यांचा सन्मान केला जातो. आता तुम्ही बघा तुम्ही एका मिनिटात किती इडली खाऊ शकता.