Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 13:47 IST2025-10-26T13:46:52+5:302025-10-26T13:47:47+5:30

MS Dhoni Daughter Ziva Dhoni Passion: पप्पासारखं क्रिकेटर नाही, तर....पाहा जीवा धोनीचा गोंडस व्हिडिओ

Video: What do you want to be when you grow up? MS Dhonis 10-year-old girl gave 'this' answer, you will also appreciate it | Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक

Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक

MS Dhoni Daughter Ziva Dhoni: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) ने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. तेव्हापासून तो फक्त आयपीएल (IPL) मध्येच खेळताना दिसतो. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर धोनी सध्या आपली पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासोबत वेळ घालवत आहे.

सोशल मीडियावर धोनी कुटुंबाचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच चर्चेत असतात. आता परत एकदा अशाच प्रकारच्या एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओत धोनीची मुलगी जीवा दिसते. मोठी झाल्यावर काय बनायचे आहे? या प्रश्नाचे जीवाने दिलेले उत्तर चर्चेत आले आहे. 

जीवा धोनी काय म्हणाली?


अलिकडेच धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी जीवा हरिद्वारला गेल्या होत्या. तिथे श्रीगंगा सभेचे महामंत्री तन्मय वशिष्ठ यांनी जीवाला विचारले की, “तू मोठी झाल्यावर काय बनू इच्छितेस?” या प्रश्नावर 10 वर्षांची जीवा निरागसपणे म्हणाली- “मी नेचरलिस्ट बनायचे आहे.” त्यावर साक्षी हसत म्हणाली, “मी आशा करते की ही पुढे जाऊन खरोखरच ते बनो.” जीवाचे हे उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘नेचरलिस्ट’ म्हणजे काय?

नेचरलिस्ट म्हणजे असा व्यक्ती, जो पर्यावरण, निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनासाठी काम करतो. जीवा म्हणाली की, ती भविष्यात पर्यावरणाशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी होऊ इच्छिते. विशेष म्हणजे, धोनी स्वतःही पर्यावरणाबाबत जागरुक आहे. त्याने रांचीतील आपल्या फार्महाऊसवर सेंद्रिय शेती (Organic Farming) सुरू केली असून, तिथे विविध प्रकारची झाडेही लावतो. त्यामुळे जीवाचे हे स्वप्न तिच्या वडिलांच्या जीवनशैलीशी जुळते.

Web Title : धोनी की बेटी जीवा बड़ी होकर प्रकृतिवादी बनना चाहती है।

Web Summary : एमएस धोनी की बेटी, जीवा, एक प्रकृतिवादी बनने की इच्छा रखती है, जो पर्यावरण और वन्यजीव संरक्षण पर ध्यान केंद्रित करती है। अपने पिता की जैविक खेती से प्रेरित होकर, उसकी महत्वाकांक्षा प्रकृति के प्रति प्रतिबद्धता को दर्शाती है।

Web Title : Dhoni's daughter Ziva wants to be a naturalist when she grows up.

Web Summary : MS Dhoni's daughter, Ziva, aspires to be a naturalist, focusing on environmental and wildlife conservation. Inspired by her father's organic farming, her ambition reflects a commitment to nature.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.