खतरनाक Video! माईक सुरु ठेवून मौलवी झोपी गेले; पुढे जे झाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 19:06 IST2021-02-19T19:05:14+5:302021-02-19T19:06:38+5:30
maulvi slept after Ajan : एका मौलवीचा व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. या मौलवीने आजान पठण केली आणि त्यानंतर माईक बंद न करताच तो झोपी गेला.

खतरनाक Video! माईक सुरु ठेवून मौलवी झोपी गेले; पुढे जे झाले...
अनेकदा असे होते की माईक चालूच राहतो आणि तिथे घडणाऱ्या पडद्यामागच्या गोष्टी साऱ्या जगाला ऐकू जातात. यामुळे अनेकदा पोलखोल होते, ज्या लोकांबाबत बोलत आहोत किंवा प्रतिक्रिया देत आहोत त्यांनाही त्या व्यक्तीचे खरे रुप समजते. सध्या मोबाईलबाबत असे प्रकार घडतात. मात्र, असाच काहीसा धक्कादायक प्रकार मौलवीसोबत घडला आहे. (maulvi slept after Ajan and snoring)
एका मौलवीचा व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. या मौलवीने आजान पठण केली आणि त्यानंतर माईक बंद न करताच तो झोपी गेला. यानंतर जे झाले ते पाहून त्यावर लोकांना हसू आवरत नाहीय. ट्विटर यूजर @dapakiguy92 ने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावर त्याने ''मौलवी साहेब माईक सुरु ठेवून झोपी गेले'', अशी ओळ लिहीली आहे. 14 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कसे मौलवी झोपले आहेत आणि त्यांच्या घोरण्याचा आवाज पुऱ्या मोहल्ल्याला ऐकू जात आहे. लोकांनाही हसू फुटले आहे. या व्हिडीओला 45 हजारहून अधिकवेळा व्ह्यूव्ज मिळाले आहेत.
Molvi sahab mic on kr k sogaye 😂😂😂 pic.twitter.com/kjBypHqGZh
— Arnold (@dapakiguy92) February 17, 2021
काही युजरनी यावर मौलवींसारखी झोप प्रत्येकाच्या नशिबी येवो, असे गंमतीदार रिअॅक्शन दिले आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप समजलेले नाही. मात्र, माईक किंवा फोन सुरु ठेवणाऱ्यांसाठी हा एकप्रकारचा धडा आहे.