VIDEO: ट्रेन 9 तास उशीराने आली; प्रवाशांनी टाळ्या वाजवून केले स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 20:18 IST2022-11-29T20:18:05+5:302022-11-29T20:18:47+5:30

रेल्वे स्टेशनवर ट्रेन उशीराने येणे भारतीयांसाठी सामान्य गोष्ट आहे.

VIDEO: Train arrives 9 hours late; passengers applauded | VIDEO: ट्रेन 9 तास उशीराने आली; प्रवाशांनी टाळ्या वाजवून केले स्वागत

VIDEO: ट्रेन 9 तास उशीराने आली; प्रवाशांनी टाळ्या वाजवून केले स्वागत


रेल्वे स्टेशनवर ट्रेन उशीराने येणे भारतीयांसाठी सामान्य गोष्ट आहे. पण, गेल्या काही महिन्यांपासून ट्रेन वेळेवर येत असल्यामुळे भारतीयांनाही त्याची सवय लागली आहे. आता प्रवाशांना उशीराने येणाऱ्या ट्रेनची सवय राहिली नाही. पण, कधी-कधी ट्रेन उशीरा आल्यावर, प्रवाशांचा पारा चांगलाच चढल्याचे पाहायला मिळते. अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे, पण या वेळेस प्रवाशांचा पारा चढण्याऐवजी त्यांनी ट्रेनचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

ही ट्रेन कोणत्या स्टेशनवरील आहे आणि घटना कधी घडली, याबाब माहिती मिळाली नाही. पण, या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओसोबत लिहिले आहे की, 'आमची ट्रेन 9 तास उशीराने आली, यावर प्रवाशांनी अशाप्रकारे रिअॅक्ट केले.' व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रवासी ट्रेनची आतुरतेने वाट पाहत आहेत. जशी ट्रेन स्टेशनवर येते, लगेच प्रवासी टाळ्या वाजवून ट्रेनचे स्वागत करतात.

सोशल मीडियावर व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे. अनेकजण यावर लाइक्स आणि कमेंट्स करत आहेत. अनेकांनी या घटनेची खिल्ली उडवली तर अनेकजण वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या सयंमाचे कौतुक करत आहेत. 

Web Title: VIDEO: Train arrives 9 hours late; passengers applauded