Video: Toddler jumps off bunk bed imitating parents shooting | Video : पती-पत्नी शूट करत होते स्टंट, मागे लहान मुलाने जे केलं ते पाहून बसेल धक्का!
Video : पती-पत्नी शूट करत होते स्टंट, मागे लहान मुलाने जे केलं ते पाहून बसेल धक्का!

अनेक धोकादायक स्टंटचे असे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असतात, ज्यात लोकांना आपला जीव गमवावा लागलाय किंवा त्यात ते गंभीर जखमी झालेत. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ज्यात एक लहान मुलगा त्याच्या आई-वडिलांची कॉपी करत चक्क बेडवरून उडी मारतो. ३ वर्षांच्या या मुलाने कॉपी करण्याच्या नादात बेडवरून उडी घेतली. सुदैवाने खाली गादी टाकलेली असल्याने मोठा अनर्थ टळला.

हा व्हिडीओ लहान मुलाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, लहान मुलगा गॅबरिअलची आई अ‍ॅन्ड्री पतीच्या दिशेने उडी घेते.

मुलगा आईला कॉपी करतो आणि बेडवरून खाली उडी घेतो. हा हृदयाचे ठोके चुकवणारा स्लो मोशन व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

हा व्हिडीओ पाहून लोक कपलवर टिका करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'हा व्हिडीओ फनी वाटतो कारण मुलगा पडल्यानंतर हलू लागतो. पण जर मुलाच्या मानेला इजा झाली असती तर मोठा अनर्थ झाला असता. आई-वडिलांनी मुलांची काळजी घेतली पाहिजे'.


Web Title: Video: Toddler jumps off bunk bed imitating parents shooting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.