VIDEO : रेल्वेच्या खिडकीतून चोरी करण्याच्या प्रयत्नात होता चोर, बघा कशी झाली त्याची फजिती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:15 IST2025-01-23T13:14:34+5:302025-01-23T13:15:20+5:30
Viral Video : एक चोर खिडकीला बाहेरून लटकलेला दिसत आहे. चोर रेल्वेच्या खिडकीला लटकून फोन किंवा इतर वस्तू चोरी करण्याच्या प्रयत्नात होता.

VIDEO : रेल्वेच्या खिडकीतून चोरी करण्याच्या प्रयत्नात होता चोर, बघा कशी झाली त्याची फजिती!
Viral Video : चोरी करण्यासाठी चोर वेगवेगळी शक्कल लढवत असतात. काही चोर तर असा काही कारनामा करतात की, बघून विश्वास बसत नाही. अशाच एका चोराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कानपूर रेल्वे स्टेशनहून सुटलेल्या रेल्वेचा आहे. ज्यात एक चोर खिडकीला बाहेरून लटकलेला दिसत आहे. चोर रेल्वेच्या खिडकीला लटकून फोन किंवा इतर वस्तू चोरी करण्याच्या प्रयत्नात होता.
व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, जेव्हा खिडकीजवळ बसलेल्या प्रवाशांनी त्याला पाहिलं तेव्हा ते सतर्क झाले आणि त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. यादरम्यान चोर सीटवर पडलेलं काहीतरी खातानाही दिसत आहे.
धावत्या रेल्वेच्या खिडकीमध्ये लटकून चोर कार कोचच्या खुर्चीच्या हॅंडलला पुन्हा पुन्हा खाली-वर करत आहे. प्रवासी त्याच्यापासून दूर उभे आहेत. वेगानं धावत असलेल्या रेल्वेच्या खिडकीत चोर कोणत्याही भीतीशिवाय काहीबाही करत आहे. नंतर हा व्हिडीओ संपतो.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @travel_with_ahmad0 नावाच्या यूजरनं पोस्ट केला आहे. त्यानं कॅप्शनला लिहिलं आहे की, 'जीवनावर प्रेम नाही'. आतापर्यंत या व्हिडिओला ३० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, तर ६७ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर कमेंट करून चोराला पोलिसांच्या हवाली करण्याचा सल्ला दिला आहे. तर एका यूजरनं लिहिलं की, ही रेल्वे लखनौ ते दिल्ली दरम्यान चालणारी गोमती एक्सप्रेस असू शकतो.