बाबो! दोन हातात दोन तरूणींना उचलून केली एक्सरसाईज, व्हिडीओ पाहून लोकांची बोलती बंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 16:53 IST2024-09-27T16:52:43+5:302024-09-27T16:53:33+5:30
VIDEO : सध्या एका बॉडी बिल्डरचा एक्सरसाईज करतानाचा वेगळाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात तो दोन हातांनी दोन तरूणांनी उचलून एक्सरसाईज करताना दिसत आहे.

बाबो! दोन हातात दोन तरूणींना उचलून केली एक्सरसाईज, व्हिडीओ पाहून लोकांची बोलती बंद!
VIDEO : अनेक बॉडी बिल्डर्सचे एक्सरसाईज करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. वेगवेगळे बॉडी बिल्डर वेगवेगळ्या प्रकारचे वजन उचलतात. पण सध्या एका बॉडी बिल्डरचा एक्सरसाईज करतानाचा वेगळाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात तो दोन हातांनी दोन तरूणांनी उचलून एक्सरसाईज करताना दिसत आहे.
द माउंटेन नावाने प्रसिद्ध बॉडी बिल्डर हाफथोर ज्यूलिअस ब्योर्नसनचा हा व्हिडीओ आहे. व्हिडिओत त्याने केवळ तरूणींना उचललं नाही तर शोल्डर प्रेस करतानाही दिसत आहे. तरूणींनी पोटाच्या वर एक बेल्ट बांधला आहे. त्याच्या मदतीने त्याने तरूणींना उचललं आहे. लोक हा व्हिडीओ पाहून अवाक् झाले आहेत. कारण एकाचवेळी अशाप्रकारे दोन तरूणींना उचलून एक्सरसाईज करणं काही खायचं काम नाही. व्हिडीओ बघण्यासाठी इथे क्लीक करा.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "माउंटेनने पुन्हा एकदा त्याची अलौकिक शक्ती दाखवली. हे घरी करण्याचा प्रयत्न करू नका". ketchy1911 नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ३ कोटी ९ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांनी कमेंट्स करून द माउंटेनचं भरभरून कौतुक केलं आहे.
दरम्यान, द माउंटेन नावाचं कॅरेक्टर प्रसिद्ध गेम ऑफि थ्रोनमधील आहे. सीरीजमध्ये द माउंटेन त्यांचं टोपण नाव आहे. त्याचं नाव सर ग्रेगर क्लेगन आहे.