बाबो! बंदुकीतून सोडलेली गोळी दातांनी अडवतो हा 'जवान'? कुणी करतंय कौतुक तर कुणी म्हणतंय फेक....
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 13:36 IST2019-08-09T13:33:45+5:302019-08-09T13:36:19+5:30
काही सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर हिरो हातांनी बंदुकीच्या गोळ्या अडवतो. तसंच काहीसं ही व्यक्ती करते.

बाबो! बंदुकीतून सोडलेली गोळी दातांनी अडवतो हा 'जवान'? कुणी करतंय कौतुक तर कुणी म्हणतंय फेक....
जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. जे अजब-अजब कारनामे करत असतात. अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. काही सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर हिरो हातांनी बंदुकीच्या गोळ्या अडवतो. तसंच काहीसं ही व्यक्ती करते. पण हातांनी नाही तर दातांनी बंदुकीतून सोडलेली गोळी अडवतो.
९ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये ही व्यक्ती बंदुकीतून सोडलेली गोळी त्याच्या दातांनी पडकतो. आता काही लोक या व्हिडीओचं कौतुक करत आहेत तर काही लोक हा व्हिडीओ फेक असल्याचं म्हणत आहेत.
हा व्हिडीओ साधारण दोन आठवड्यांपूर्वी फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. आणि आतापर्यंत ६.४ मिलियन वेळा हा व्हिडीओ पाहिला गेलाय. या व्हिडीओत एक व्यक्ती सैनिकाच्या कपड्यात दिसत आहे. आधी त्याने रायफलने नंतर पिस्तुलाने गोळ्या झाडल्या आणि दातांनी पकडून दाखवल्या.
एकीकडे काही लोक या व्हिडीओतील व्यक्तीचं कौतुक करत आहेत तर दुसरीकडे काही यूजर्स यात काहीतरी गडबड असल्याचं सांगत आहेत. एका यूजरने सांगितले की, जी गोळी जमिनीवर पडलेली दाखवली, ती रायफलमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोळीपेक्षा लहान आहे. असेच आणखीही काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ फेक आहे की, रिअल असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.