Video: Puppy Gets A ‘Desi Swagat’ With Aarti & Tilak As Family Showers Rose Petals | क्या बात! भारतीय परंपरेने घरात केलं कुत्र्याचं स्वागत, व्हिडीओ पाहून लोक भारावले

क्या बात! भारतीय परंपरेने घरात केलं कुत्र्याचं स्वागत, व्हिडीओ पाहून लोक भारावले

घरात वेगवेगळे प्राणी पाळण्याची अनेकांना आवड असते. ते या प्राण्यांना घरातील सदस्यांसारखे वागवतात. प्राणी आणि मनुष्यांच्या प्रेमाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात नेहमीच व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका कुत्र्याच्या पिल्लाचं घरात अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलंय.

सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे पारंपारिक रितीरिवाजासोबत या कुत्र्याच्या पिल्ल्याचं स्वागत करण्यात आलं. एखाद्या नव्या नवरीने नव्या घरात प्रवेश करावा तसंच या कुत्र्याच्या पिल्लाचं स्वागत करण्यात आलंय.

कुत्र्याला घरात आणण्यापूर्वी दरवाज्यात फुले टाकलेली आहेत. त्यानंतर कुत्र्याच्या पंजाना लाल रंगाच्या थाळीमध्ये बुडवून एका पांढऱ्या कागदावर त्याच्या पंजाचे निशाण घेतले. घरातील दुसऱ्या एका मुलीने त्याला टिळा लावला आणि परिवारातील सदस्याप्रमाणे त्याचं स्वागत केलं. इतकेच नाही तर पारंपारिक पद्धतीने कुत्र्याची आरतीही काढण्यात आली. तसेच त्याच्यावर फुलाच्या पाकळ्यांचा वर्षावही केला. 

आरती केल्यानंतर कुत्र्याला मिठाई खायला देऊन तोंड गोड करण्यात आलंय. सोबतच बॅकग्राऊंडला कभी खुशी कभी गम सिनेमाचं टायटल सॉंगही लावलं होतं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप पसंत केला जात आहे. लोक यावर भरभरून कमेंटही करत आहेत. 

Video : कुत्र्याच्या पिल्लाला कासवासह खेळण्याची भारीच हौस; नेटिझन्सनी पाडला लाईक्सचा पाऊस

Video : भूकेलेल्या खारूताईचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल; 'याला म्हणतात माणुसकी'

रिअल हिरो! चालत्या बाईकवरून उडी घेत बाईकस्वारानं चिमुकल्याला वाचवलं; पाहा व्हिडीओ

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Video: Puppy Gets A ‘Desi Swagat’ With Aarti & Tilak As Family Showers Rose Petals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.