Shocking Video: खऱ्या नागासोबत नागिण डान्स करताना दिसले वराती, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 15:33 IST2022-04-29T15:31:10+5:302022-04-29T15:33:27+5:30

Odisha Snake Video: व्हिडीओ इतका खतरनाक आहे की, बघून अंगावर काटा येतो. व्हिडीओत एक वरात नाचताना दिसत आहे. ज्यात वराती खऱ्या नागासोबत डान्स करताना दिसत आहे. 

Video : People seen dancing with the real cobra in wedding procession in Odisha | Shocking Video: खऱ्या नागासोबत नागिण डान्स करताना दिसले वराती, व्हिडीओ व्हायरल

Shocking Video: खऱ्या नागासोबत नागिण डान्स करताना दिसले वराती, व्हिडीओ व्हायरल

Odisha Snake Video: सोशल मीडियावर हैराण करणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सध्या ओडिशातील एक असा व्हिडीओ समोर आला आहे जो बघून लोक संतापले आहेत. लोकांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. व्हिडीओ इतका खतरनाक आहे की, बघून अंगावर काटा येतो. व्हिडीओत एक वरात नाचताना दिसत आहे. ज्यात वराती खऱ्या नागासोबत डान्स करताना दिसत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ झी न्यूजच्या हाती लागला. हा व्हिडीओ ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील आहे. वरातीत आलेले लोक यावेळी कोब्रासोबत डान्स करताना दिसले. व्हिडीओत तुम्ही एका गारोड्याला सापासोबत बघू शकता. तो सापाला हाती घेऊन नाचत आहे. हा व्हिडीओ समोर येताच वाद पेटला आहे.

लग्नाच्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की वरातीत बरेच लोक आले आहेत. सगळेजण जल्लोषात डान्स करत आहेत. यावेळी गारूडी सापाची टोपली उघडतो. त्यात एक किंग कोब्रा आहे. ती व्यक्ती सापाची टोपली वर उचलून डान्स करू लागले. तर लोक सापाशी खेळ करताना दिसत आहेत.

स्थानिक लोकांनी जेव्हा हा नजारा पाहिला तर त्यांना हे अजिबात आवडलं नाही. स्थानिक लोकांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस आले आणि त्यांना पाच लोकांना अटक केली.
 

Web Title: Video : People seen dancing with the real cobra in wedding procession in Odisha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.