Video - हृदयद्रावक! लग्नात आनंदाने नाचत होते काका पण अचानक...; कॅमेऱ्यात कैद झाला 'मृत्यू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 16:38 IST2022-05-19T16:37:15+5:302022-05-19T16:38:46+5:30

लग्नात नाचताना ही व्यक्ती कोसळली आणि तिचा जागीच जीव गेला आहे. सोशल मीडियावर हा धक्कादायक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतो आहे.

Video on spot deadth captured on camera while dancing at wedding | Video - हृदयद्रावक! लग्नात आनंदाने नाचत होते काका पण अचानक...; कॅमेऱ्यात कैद झाला 'मृत्यू'

Video - हृदयद्रावक! लग्नात आनंदाने नाचत होते काका पण अचानक...; कॅमेऱ्यात कैद झाला 'मृत्यू'

नवी दिल्ली - कधी, कुठे, कसं, काय होईल हे नेमकं कोणालाच सांगता येत नाही. मृत्यूच्या बाबतीतही तसंच असतं. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका व्यक्तीचा नाचता नाचता मृत्यू झाला आहे. लग्नात नाचताना ही व्यक्ती कोसळली आणि तिचा जागीच जीव गेला आहे. सोशल मीडियावर हा धक्कादायक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतो आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

लग्नामध्ये एक व्यक्ती दोन महिलांसोबत डान्स करतो आहे. शशी कपूरचं बदन पे सितारे लपेटे हुए हे गाणं व्हिडीओमध्ये ऐकायला येतं आहे. ही व्यक्ती या गाण्याचा पुरेपूर आनंद घेते. उत्साहाने गाण्यावर डान्स करते आहे. व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभावही पाहण्यासारखे आहेत. त्यांचा डान्स पाहून उपस्थित असलेले लोकही त्यांना प्रोत्साहित करत आहेत. टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करत आहेत.

डान्स करताना अचानक या व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागतं. त्यामुळे ते डान्स करणं थांबवतात आणि स्टेजवर बसतात. तितक्यात त्यांच्यासोबत नाचणाऱ्यापैकी एक महिला त्यांना काय झालं म्हणून विचारायला जाते. काही कळायच्या आतच ते पटकन स्टेजवर कोसळतात. जागच्या जागी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.

प्रतीक दुआ नावाच्या फेसबुक युजरने आपल्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मृत्यूची काही वेळ नाही, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युजरने म्हटलं आहे ही मोठ्या आवाजातील गाण्यांमुळे इतक्या वयाच्या व्यक्तींच्या हृदयावर खूप परिणाम होतो. या व्यक्तीच्या मृत्यूचं कारण मोठ्या आवाजात लावण्यात आलेलं गाणं असू शकतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Video on spot deadth captured on camera while dancing at wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.