लहान मुलाने घडवून आणली माय-लेकाची भेट! व्हिडीओ पाहून येईल डोळ्यांत पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 09:52 IST2023-05-17T09:51:27+5:302023-05-17T09:52:47+5:30

Adorable Video: या व्हिडिओत मन जिंकलं ते एका चिमुकल्या मुलाने. यात तो मेंढीच्या पिल्लाला त्याच्या आईची भेट करून देताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुमचे डोळे पाणावतील.

Video of little boy helps reuniting lost lamb with its mother is going viral on social media | लहान मुलाने घडवून आणली माय-लेकाची भेट! व्हिडीओ पाहून येईल डोळ्यांत पाणी

लहान मुलाने घडवून आणली माय-लेकाची भेट! व्हिडीओ पाहून येईल डोळ्यांत पाणी

Adorable Video: सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओ समोर येतात, जे बघून खूप आनंद होतो. तर काही व्हिडीओ असे असतात जे बघून आपोआप डोळ्यांच्या पापण्या ओलावतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात एका मेंढी आणि तिच्या पिल्लाचं प्रेम बघायला मिळत आहे. या व्हिडिओत मन जिंकलं ते एका चिमुकल्या मुलाने. यात तो मेंढीच्या पिल्लाला त्याच्या आईची भेट करून देताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुमचे डोळे पाणावतील.

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक छोटा मुलगा मोकळ्या जागेत एका मेंढीच्या पिल्लासोबत उभा आहे. हे पिल्लू आपल्या आईला शोधत आहे. पण ती दिसत नसल्याने सैरभैर झालं आहे. अशात हा छोटा मुलगा या पिल्लाची आई शोधतो आणि त्यांची भेट घडवून आणतो. पिल्लाची आई दुरून धावत आपल्या पिल्लाजवळ येते. दोघांनाही असं बघून छोटा मुलगा आनंदी होतो. या लहान मुलाची निरागसता पाहून मन भरून येतं.

हा व्हिडीओ ट्विटरवर @Yoda4ever नावाच्या हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लोक शेअर करत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, 'लहान मुलगा हरवलेल्या पिल्लाला त्याच्या आईशी भेटवून देतो'. 

केवळ 3 सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत 1.8 मिलियन वेळा पाहिलं गेलं आहे. तर 50 हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ लाइक केला आहे. लोक यावर अनेक कमेंट्सही करत आहेत.

Web Title: Video of little boy helps reuniting lost lamb with its mother is going viral on social media