VIDEO: मेट्रोत मद्यपान? भरलेला ग्लास तरुणाने केला रिकामा, अंडही खाल्लं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:43 IST2025-04-07T16:31:52+5:302025-04-07T17:43:10+5:30
दिल्ली मेट्रोमध्ये एक प्रवासी मद्यपान करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

VIDEO: मेट्रोत मद्यपान? भरलेला ग्लास तरुणाने केला रिकामा, अंडही खाल्लं
Delhi Metro Viral Video:दिल्लीमेट्रो गेल्या काही दिवसांपासून प्रवासाऐवजी इन्स्टाग्राम रील्सचे केंद्र बनलं आहे. अनेक इन्फ्लुएंसर दिल्लीमेट्रोमध्ये अनेक प्रकारचा कॉन्टेट तयार करतात. यामुळे कधी प्रेक्षकांचे मनोरंजन होते तर कधी व्हिडीओतून येऊ नये म्हणून तोंड लपवावे लागते. प्रशासनाकडून कारवाई होऊनही हे लोक काय थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे आता प्रवाशांचीही भीड चेपली आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण दिल्ली मेट्रोमध्ये एक प्रवासी मद्यपान करत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ समोर आला आहे. मेट्रोत बसून एका प्रवाशाने मद्यपान केल्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
दिल्ली मेट्रोमध्ये दररोज लोक असे काहीतरी करताना दिसतात. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक माणूस मेट्रोत बसून दारू पीत असल्याचा दावा केला जातोय. एवढंच नाही तर त्याने तिथे अंडे सोलून खाल्ले. ती व्यक्ती उघडपणे डीएमआरसीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. समोर बसलेल्या एका प्रवाशाने त्याच्या कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता या प्रवाशावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
व्हिडिओ कधीचा आणि कोणत्या मेट्रो मार्गाचा आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सीटवर बसलेली आहे. सर्वप्रथम ती व्यक्ती आपल्या बॅगेतून अंड बाहेर काढतो. अंड सोलण्यासाठी त्याने मेट्रोमधील कॅच रॉड पाईपचा वापर केला. पाईप रॉडवर त्याने अंडे आपटले आणि सोलून बाजूला ठेवले. यानंतर तो ग्लास तयार करतो. त्यानंतर ग्लासातील पिवळ्या द्रव पदार्थाचा आस्वाद घेत त्याने अंड खाण्यास सुरुवात केली. मद्यपान झाल्यानंतर त्याने ग्लास आणि अंड्याच्या टरफल्याचा कचरा बॅगेत ठेवला.
सर यह युवक के दिल्ली मेट्रो में बैठकर शराब पी रहा है @DelhiPolice@OfficialDMRC@CISFHQrs@HMOIndia
— 🇮🇳Jitendra pratap singh🇮🇳 (@jpsin1) April 7, 2025
इस पर कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए pic.twitter.com/O8YLMeKMu5
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओवर यूजर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. दिल्ली मेट्रोमध्ये दारू बंदी असताना तरुणाने ती आतमध्ये कशी आणली, असा सवाल काहीजण विचारत आहेत. तर काही युजर्स तो दारु पिताना कोणाला त्रास देत नाहीये असं म्हटलं. एका युजरने या व्हिडिओमध्ये काय चूक आहे? कोणी शांतपणे समजावून सांगेल का? त्याने काही ड्रिंक्स प्यायले आणि कोणाला त्रास न देता उकडलेले अंडे खाल्ले, काही गडबड तर केली नाही ना? याचा लोकांचा राग का येतोय? असा सवाल केला. आणखी एका युजरने दिल्ली मेट्रो आणि दिल्ली पोलिसांनी याची दखल घेऊन योग्य ती शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
समोर आलं सत्य
दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती प्रत्यक्षात ॲपी फिज पीत होती. सोशल मीडियावर गैरसमज पसरल्यानंतर त्या व्यक्तीने स्वत: सांगितले की तो ॲपी फिज पीत आहे. हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामच्या फूड रिपब्लिक इंडिया अकाउंटवर पोस्ट करण्यात आला होता.