सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोड-रेज आणि अश्लील इशाऱ्यांशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक तरुणी शांतपणे रस्त्यावरून आपली बाईक चालवत जात होती, तितक्यात जवळून जाणाऱ्या एका ई-रिक्षात बसलेल्या तरुणांनी तिच्याकडे बघून अश्लील इशारे केले. ही घटना केवळ संतापजनकच नाही, तर रस्त्यावरील महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे.
तरुणाच्या या कृत्यानंतर तरुणीने गप्प बसणं योग्य मानलं नाही. तिने न घाबरता आपली बाईक थांबवून ती ई-रिक्षा अडवली आणि त्या तरुणाला जाब विचारला. यावेळी तरुणीने पोलिसांना बोलावण्याची धमकी दिली आणि संताप व्यक्त करत तरुणाच्या जोरदार कानाखाली मारली.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी मुलीचं भरभरून कौतुक केलं आहे. एका युजरने लिहिलं, "शाब्बास! रस्त्यावर किंवा कुठेही कोणतीही चुकीची गोष्ट, अन्याय सहन करू नये. ठामपणे आपल्या हक्कासाठी उभं राहणं हेच एक उत्तम उदाहरण आहे."
आणखी एका युजरने म्हटलं, "हा मुद्दा अशा पद्धतीने उचलणं हे मुलीसाठी खूप धैर्याचं काम आहे. अभिनंदन!" तर दुसऱ्या युजरने लिहिलं की, "हे अगदी योग्य आहे. काही लोकांना चालत्या रिक्षात बसून असं वाटतं की आपल्याला कोणीही पकडू शकत नाही. आज त्यांना योग्य धडा मिळाला. हे पाहून समाधान वाटलं." सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Web Summary : A video shows a girl on a bike being harassed by a youth in an e-rickshaw. She stopped him, confronted him, and slapped him for his obscene gestures. The video went viral, sparking supportive comments applauding her bravery.
Web Summary : एक वीडियो में एक लड़की को ई-रिक्शा में बैठे एक युवक द्वारा परेशान किया जा रहा है। उसने उसे रोका, उसका सामना किया, और उसके अश्लील इशारों के लिए उसे थप्पड़ मारा। वीडियो वायरल हो गया, जिससे उसकी बहादुरी की सराहना करते हुए टिप्पणियां आईं।