VIDEO : मगरीसोबत स्टंट करत होती व्यक्ती, पुढे जे झालं ते बघून मनात भरेल धडकी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 17:07 IST2024-07-20T16:59:51+5:302024-07-20T17:07:40+5:30
Viral Video : व्हिडीओत एक व्यक्ती एका मगरीसोबत स्टंट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण काही सेकंदात असं काही घडतं की, जे बघून तुम्हीही हैराण व्हाल.

VIDEO : मगरीसोबत स्टंट करत होती व्यक्ती, पुढे जे झालं ते बघून मनात भरेल धडकी!
Viral Video : अनेक खतरनाक जंगली प्राणी लोक पाळतात, पण त्यांना पाळीव प्राणी समजलं ही एक मोठी चूक ठरते. याचा परिणाम त्यांना अनेकदा भोगावा लागतो. नुकताच असंच काही दाखवणारा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. अनेक शोजमध्ये प्राण्यांसोबत स्टंट केल्याचे दाखवले जाते. पण हे स्टंट एक्सपर्ट्सच्या मार्गदर्शनाखाली केले जातात. मात्र, अनेकदा लोक ओवर-कॉन्फिडन्सच्या नादात असं काही करतात की, त्यांना मोठा फटका बसतो. व्हिडीओत एक व्यक्ती एका मगरीसोबत स्टंट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण काही सेकंदात असं काही घडतं, जे बघून तुम्हीही हैराण व्हाल.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @NeverteIImeodd नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात एक व्यक्ती मगरीसोबत खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. पण अचानक व्यक्तीसोबत असं काही होतं जे बघून आजूबाजूचे लोकही चक्रावून जातात.
Overconfidence 💀 pic.twitter.com/wMCUidvs0f
— Second before disaster (@NeverteIImeodd) July 18, 2024
मुळात अशा खतरनाक प्राण्यांसोबत स्टंट करताना खूप काळजी घेतली जाते. पण या स्टंटमध्ये व्यक्ती चक्क आपलं डोकं मगरीच्या तोंडात देतो. त्याला वाटलं मगर काही करणार नाही. पण मगरीने लगेच जबडा बंद केला आणि त्याचं डोकं तोंडात धरलं. अशात काही लोक लगेच मदतीसाठी धावून येतात.
व्हिडीओच्या कॅप्शनला एकच योग्य शब्द लिहिण्यात आला आहे तो म्हणजे 'ओवर-कॉन्फिडन्स.' व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं की, "हा मूर्खपणा आहे". दुसऱ्या एका यूजरने लिहिलं की, "मृत्यूच्या दारातून परत येण्याचा विचार करत होता".